लहान मुलं फुगेवाल्याच्या मागोमाग पळत होती अन् धाड…. स्फोटाने गल्लीच हादरली, फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, १ ठार तर ११ जखमी

हा स्फोट झाला तेव्हा त्या फुगेवाल्याच्या आसपास बरीच मुलं होती, ती जखमी होऊन खाली कोसळली. एकच कल्लोळ माजला. आजूबाजूच्या लोकांना तातडीने त्यांना उचलून रुग्णालयात धाव घेतली.

लहान मुलं फुगेवाल्याच्या मागोमाग पळत होती अन् धाड.... स्फोटाने गल्लीच हादरली, फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट, १ ठार तर ११ जखमी
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 9:31 AM

लातूर | 16 ऑक्टोबर 2023 : रंगीबेरंगी, हवेत डुलणारे छान-छान फुगे घेऊन तो गल्ल्यांमध्ये फिरत होता. ते फुगे पाहून अनेक मुलं त्याच्या मागे-माग फुरत होती. एक गल्लीत तो थांबला आणि समोर आलेल्या मुलाला देण्यासाठी फुग्यात हवा भरतच होता तितक्यात…. धाडकन आवाजाने आसमंत दणाणून गेला. एका झटक्यात एवढा मोठा स्फोट झाला की सगळचे हादरले. फुग्यात हवा भरताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एकाच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले.

लातूर शहरातील तावरजा कॉलनी परिसरात रविवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या स्फोटामध्ये फुगेवाल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा स्फोट एवढा भीषण होता, की त्या स्कूटरचाही चक्काचून झाला. तर फुगे घेण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी केलेल्या मुलांपैकी ११ मुलं गंभीर जखमी झाली. जखमी बालकांवर सध्या लातरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे समजते.

तिथे नेमकं काय झालं, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं ?

ही घटना घडली तेव्हा काही जण तिथे उपस्थित होते, त्यांच्यापैकी एकाने तिथे नेमकं काय घडलं ते सांगितलं.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास हा स्फोट झाला. गॅस सिलिंडरमधून फुग्यात हवा भरून विकणारा हा फुगेवाला गेल्या २-३ दिवसांपासून सतत गल्लीमध्ये वावरत होता. बऱ्याच जणांनी त्याला तेथून हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र थोड्या वेळाने तो पुन्हा यायचा. कालही तो गल्लीत फिरत होता, लेकरं त्याच्यामागे गोंधळ घालत फिरत होती, हे पाहून काही लोकांनी त्याला परत तिथून निघून जायला सांगितलं.

तिथून तो फुगेवाला मागच्या गल्लीत गेला. आणि फुगे घेण्यासाठी इतर मुलही त्याच्या मागोमाग गेली. मात्र जेव्हा तो फुग्यात हवा भरत होता, तेव्हा एकदम जोरात स्फोट झाला. गल्लीत कोणीतरी बाँब फोडल्यासारखाचा आवाज आला. ते ऐकून आजबाजूचे लाक काय झालं ते पहायला घरातून बाहेर आले. तेव्हा ते फुगेवाला निष्प्राण होऊन खाली कोसळला होता तर बाजूला असलेली लहान मुलं जखमी होऊन रस्त्यावर पडली होती. त्यांच्यावर दगडाचा वर्षाव झाल्यासारखी ती जखमी झाली होती.

ते दृश्य पाहून लोकं हादरले पण त्यांनी क्षणभरही वेळ न दवडता मदतीसाठी धाव घेतली. कुठे कोणाचं पोरं आहे हे न बघता, समोर दिसेल त्या जखमी मुलाला उचललं आणि त्यांना घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. बऱ्याच पालकांना तर माहीतही नव्हतं की आपलं मूल या स्फोटात जखमी झालं आहे. त्यांना कळल्यानंतर ते रुग्णालयात आले.

मात्र यापुढे अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी अशा विक्रेत्यांवर बंदी घालावी. जो त्रास आम्हाला झाला तो इतर कोणालाही होऊ नये यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Non Stop LIVE Update
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.