रात्री पळवून नेत होता…सकाळी प्रेयसीचा झाकलेला चेहरा दिसताच प्रियकराच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले, काय आहे हे प्रकरण
गर्लफ्रेंडला रात्री पळवून नेत होता, सकाळी गर्लफ्रेंडचा खरा चेहरा समोर आल्यानंतर उडाले तरुणाच्या चेहऱ्यावरचे प्रेमाचे रंग... काय आहे प्रकरण?

सोशल मीडियाच्या काळात काय होईल सांगता येत नाही. सोशस मीडियामुळे जग जवळ आलं आहे. पण फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे. आता देखील असंच काही झालं आहे. एक तरुण – तरुणी यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मैत्री होते. त्यानंतर मैत्रीचं प्रेमात रुपांतर होतं. दिवसागणिक दोघांच्या प्रेमात वाढ होत होती. प्रेमासाठी तरुणी घरातून पळाली आणि तरुणाला भेटली… वाटेत जेव्हा तरुणाने मुलीचा चेहरा पाहिला तेव्हा तरुणाला मोठा धक्का बसला. तरुणाने त्याच्या प्रेयसीला घरी पाठवण्यासाठी सुरीर पोलिसांच्या स्वाधीन केले. सादाबाद पोलिसांनी दोघांनाही सोबत घेतले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हाथरसच्या सादाबाद पोलीस स्टेशन परिसरातील एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार केलं होतं. रोजच्या चॅटींगदरम्यान तिची दिल्लीतील पटेल नगर येथील एका तरुणाशी मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांनीही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली आणि एकमेकांसोबत राहण्याचं वचन दिलं.
प्रेमाच्या आवेगात, मुलीने तिच्या प्रियकरासोबत घरातून पळून जाण्यास सहमती दर्शवली. शनिवारी प्रियकर दिल्लीहून सादाबादला पोहोचला. संधी साधून, मुलगीही घरातून पळून तिच्या प्रियकराकडे आली. रात्री दोघेही रस्ता चुकले आणि मांटला पोहोचले. तोपर्यंत सकाळ झाली होती.
एका झटक्यात नाहीसं झालं प्रेम
तरुणाने मुलीचा चेहरा पाहिल्यानंतर त्याच्या भूवया उंचावल्या. तरुणीचा सोशल मीडियावर फोटो वेगळा होता आणि खरी तरुणी वेगळी होती. अशात, रविवारी दुपारी तरुण सुरीर पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना सांगितलं की, मुलगी त्याच्यासोबत पळून गेली आहे. हे ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. तरुणाने मुलीला तिच्या घरी पाठवण्याची विनंती केली.
तपासात तरुणीने सांगितलं की, तरूणाने तिच्यासोबत काहीही वाईट केलेलं नाही. सुरीर पोलिसांच्या माहितीवरून, सादाबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश कुमार यांनी दोघांनाही सोबत घेतले. प्रभारी निरीक्षक प्रमोद कुमार म्हणाले की, दोघांनाही सादाबाद पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
