दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?

पोलिसांनी मुलीची आई स्वातीची चौकशी करताना तिचा मोबाईल तपासला असता, तिने गूगल-युट्यूबवर मुलीला मारण्याचे मार्ग शोधल्याचे आढळून आले. आता पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

दहा दिवस पोलिसांना गुंगारा, पोटच्या पोरीला टाकीत बुडवून मारणारी आई Google मुळे कशी सापडली?
मध्य प्रदेशात बाळाची हत्या करणारी आई
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 12:05 PM

भोपाळ : मध्य प्रदेशातील उज्जैनमधील खाचरोड येथे एका आईने आपल्या 3 महिन्यांच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. आईने गुगलवर बाळाची हत्या करण्याची पद्धत सर्च केली होती. ही घटना 12 ऑक्टोबरला घडली होती, मात्र दहा दिवस पोलिसांना गुंगारा देणारी निष्ठुर आई अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली. खाचरोड येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मुलीच्या आई स्वातीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

हत्येची नेमकी कारणं अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खाचरोड पोलीस ठाण्यासमोर राहणाऱ्या  कुटुंबातील 3 महिन्यांची मुलगी 12 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. तपासानंतर तिचा मृतदेह घरात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत सापडला. घटनेपासून पोलिसांच्या कुटुंबीयांवरच संशय होता.

गुगल सर्चची मदत

मुलीच्या घरी वडील अर्पित, आई स्वाती, आजी अनिता, आजोबा सुभाष राहतात. पोलिसांनी मुलीची आई स्वातीची चौकशी करताना तिचा मोबाईल तपासला असता, तिने गूगल-युट्यूबवर मुलीला मारण्याचे मार्ग शोधल्याचे आढळून आले. आता पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

घटनेच्या वेळी केवळ आई-आजी घरात

अतिरिक्त एसपी आकाश भुरिया यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी खाचरोडमध्ये मुलीची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी सुरुवातीपासूनच तपासाला अतिशय गांभीर्याने घेतले होते, कारण 3 महिन्यांच्या मुलीविषयीचे प्रकरण होते आणि आधीपासूनच पोलिसांच्या रडारवर तिचे कुटुंबीय होते. घटनेच्या वेळी मुलगी आणि तिची आई, आजी यांच्याशिवाय घरात कोणीही नव्हते.

हत्येचं कारण अस्पष्टच

जेव्हा तिच्या आईची चौकशी करण्यात आली आणि तिच्या मोबाईलची हिस्ट्री आणि तिचे गुगल सर्च पाहिले, तेव्हा पोलिसांना बरेच पुरावे मिळाले. ज्यात असे आढळून आले की मुलीची हत्या तिच्या आईने केली होती. तिला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप तिने उलगडलेले नाही, सर्व पुरावे रिमांडवर घेण्यात आले आहेत आणि सापडलेले सर्व परिस्थितीजन्य पुरावे आईच्या विरोधात आहेत.

हे ही वाचा :

अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर

8 ते 11 वर्षाच्या मुलांकडून 6 वर्षीय चिमुकलीसोबत भयावह कृत्य, आपली वाटचाल नेमकी कुठल्या दिशेला चाललीय?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.