‘माझा नवरा तर बेडवरुन पडला..’ पण त्याआधी पतीने पत्नीच नको ते रुप पाहिलं, नाती कलंकित करणारं प्रकरण काय?
दोघांचा रोमान्स चाललेला. आपल्याला कोणी बघतय याचं त्यांना भानच उरल नव्हतं. त्यावेळी अचानक दरवाजा उघडला. समोर उभा असलेला माणूस जोरात ओरडला आणि विचारलं, हे काय चाललं आहे?.

दोघांचा रोमान्स चाललेला. आपल्याला कोणी बघतय याचं त्यांना भानच उरल नव्हतं. त्यावेळी अचानक दरवाजा उघडला. समोर उभा असलेला माणूस जोरात ओरडला आणि विचारलं, हे काय चाललं आहे?. रोमान्समध्ये बुडालेले दीर-वहिनी ताळ्यावर आले. समोर महिलेचा पती होता. घाबरलेली महिला पतीला म्हणाली, माझं दीरासोबत काही नाहीय. दीरही म्हणाला दादा असं काही नाहीय. पण नवऱ्याने सर्व डोळ्यांनी पाहिलं होतं. जेव्हा पत्नीला वाटलं की, आता काही होऊ शकत नाही. त्यावेळी तिने दीराच्या साथीने मिळून नवऱ्याला मारुन टाकलं. जेणेकरुन सत्य काय हे कधीच कोणाला कळू नये.
मग हत्येला दुर्घटना दाखवून दीर-वहिनी पोलिसांची दिशाभूल करु लागले. महिला म्हणाली, साहेब! माझा नवरा बेडवरुन खाली पडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पण पोस्टमार्टम रिपोर्टमधून सत्य काय ते समोर आलं. समजलं की हत्या गळा घोटल्यामुळेच झालीय. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला. सध्या दोघे तुरुंगात आहेत. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील ही घटना आहे.
एकत्र एकाखोलीत पाहिलेलं
बरायठा पोलीस ठाणे क्षेत्रात येणाऱ्या गावातील एका 25 वर्षीय युवकाची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, “मृतकाच्या पत्नीचे दीरासोबत अनैतिक संबंध होते. पतीने एकारात्री दोघांना एकाखोलीत पाहिलेलं. त्यानंतर पत्नी आणि भावाने मिळून पतीची हत्या केली”
त्यावेळी सर्व घटनाक्रमाचा खुलासा
बरायठा पोलिसांना वीरेन्द्र कुमार नावाच्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी वीरेन्द्रचा मृतदेह घराच्या खोलीतच पडलेला होता. पत्नी आणि छोट्या भावाने पोलिसांना सांगितलं की, वीरेन्द्र खाटेवरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेहाच पोस्टमार्टम केलं, त्यावेळी मृत्यू गळा आवळल्यामुळे झाल्याच सत्य समोर आलं. या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी सर्व घटनाक्रमाचा खुलासा झाला.
पोलिसांनी संशयाच्या आधारावर मृतकाची पत्नी आणि छोट्या भावाची चौकशी केल्यानंतर ते कोसळले. आपला गुन्हा त्यांनी कबूल केला. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. घटनेच्या रात्री वीरेन्द्रने दोघांना एकत्र एका खोलीत पाहिलेलं.
