कुर्‍हाडीने वार करुन तरुणाची‌ हत्या, संशयित मेहुणा पसार

मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री तरुणाची हत्या झाली. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. विशाल‌ वामन ठोसरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कुर्‍हाडीने वार करुन तरुणाची‌ हत्या, संशयित मेहुणा पसार
जळगावात मेहुण्याकडून तरुणाची हत्या

मुक्ताईनगर : मेहुण्यानेच तरुणाची‌ कुर्‍हाडीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मुक्ताईनगर शहरात गुरुवारी रात्री तरुणाची हत्या झाली. शुक्रवारी पहाटे हा प्रकार उघडकीस आला. विशाल‌ वामन ठोसरे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुर्‍हाडीने वार करुन त्याची हत्या करण्यात आली. विशालच्या मेव्हण्यानेच ही हत्या केल्याचा संशय आहे. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल खताळ दाखल झाले असून पोलिसांचा तपास सुरु आहे. संशयित मेहुणा विजय सावकारे घटनास्थळावरुन फरार असल्याने त्याचा शोध सुरू आहे.

उल्हासनगरातही मेहुण्याकडून हत्या

दुसरीकडे, उल्हासनगरमध्येही मेव्हण्याने आपल्या भाऊजींची म्हणजेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये कॅम्प 3 भागातील सुभाष नगर परिसरात ही घटना घडली. भाऊजी बहिणीला मारहाण करताना झटापट झाली, अखेर भाऊजींनी उगारलेला चाकू मेहुण्याने त्यांनाच खुपसल्याचा आरोप आहे.

नेमकं काय घडलं?

मयत सचिन खेडेकर हा पत्नी शुभांगी खेडेकर सोबत उल्हासनगरमधील सुभाष नगर भागात वास्तव्याला होता. सचिन हा व्यसनाधीन असल्याचं बोललं जातं. तो सतत पत्नी शुभांगीला मारहाण करायचा. घटनेच्या रात्री सुद्धा त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी त्याचा मेव्हणा रोशन जाधव हा वाद सोडवण्यासाठी आला. सचिनने आपल्या पत्नीला मारण्यासाठी चाकू आणला होता, मात्र सचिनने तो चाकू मेहुणा रोशनवरच उगारला. रोशनने कसाबसा स्वतःचा बचाव केला आणि तोच चाकू सचिनला भोसकला. यात सचिनचा जागीच मृत्यू झाला.

संबंधित बातम्या :

भाऊजींचं उडवलेलं डोकं घेऊन मेहुणा पोलिस स्टेशनात, बहिणीचीही आत्महत्या

बहिणीला मारहाण करणाऱ्या भाऊजींशी झटापट, चाकू खुपसून मेहुण्याने जीव घेतला

(Maharashtra Crime Jalgaon Muktainagar Brother in law killed Sister’s Husband)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI