जरंडेश्वरनंतर आणखी दोन सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर, कागदपत्रं ताब्यात

काही दिवसांपूर्वी सातारा येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला होता. त्यानंतर आता ईडीने या दोन कारखान्यांच्या व्यवहारांचीही चौकशी सुरु केली आहे.

जरंडेश्वरनंतर आणखी दोन सहकारी साखर कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर, कागदपत्रं ताब्यात
ed office

मुंबई : सहकारी साखर कारखाना घोटाळा प्रकरणात आणखी दोन साखर कारखान्यांचे व्यवहार ईडीच्या रडारवर आले आहेत. नंदुरबार येथील पुष्परेंद्धेश्वर आणि अमरावती येथील अंबादेवी सहकारी साखर कारखान्याची कागदपत्रं अंमलबाजवणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहेत. ईडीने काही दिवसांपूर्वी सातारा येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला होता. त्यानंतर आता या दोन कारखान्यांच्या व्यवहारांचीही चौकशी सुरु केली आहे.

जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची चौकशी

सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वरला 96 कोटींचे कर्ज दिले असल्याच्या खुलाशाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. जिल्हा बँकेने कर्ज देताना कोणत्या आधारावर दिलं, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी केली गेली होती, कर्ज प्रकरणाची प्रोसेस नेमकी कशी झाली, ही प्रोसेस होताना नियम आणि अटींचं पालन झालं होतं का? अशा पद्धतीने ईडी तपास करु शकते.

जरंडेश्वर ईडीच्या रडारवर का?

आघाडी सरकारच्या काळात अजित पवार शिखर बँकेचे अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी को ऑप बँकेचे अध्यक्ष होते. त्या काळात या बँकेत कथित 25 हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. तर जो जरंडेश्वर कारखाना अवसायनात निघाला, तो कवडीमोल भावाने विकल्याच आरोप आहे, तो कारखाना सुद्धा अजित पवारांच्या नातेवाईकाचा आहे. राजेंद्र घाडगे हे अजित पवारांचे मामा या बँकेचे चेअरमन आहेत. यांच्याच कार्यकाळात ईडीने या कारखान्यावर जप्तीची कारवाई केली.

जरंडेश्वरवरील कारवाईबाबत अजित पवारांची भूमिका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं केलेल्या कारवाई संदर्भात भूमिका स्पष्ट केली होती. ‘सुंदरबाग सोसायटीने याचिका दाखल केली होती. 14 कारखान्यांमध्ये जरंडेश्वर कारखाना होता. सर्व रितसर परवानग्या घेतल्या होत्या, माझ्याच नातेवाईकांचा तो कारखाना आहे. ईडीला चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सीआयडीने चौकशी केली त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही, सगळीकडून पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या आहेत. त्या संदर्भात ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जायचं आहे तिकडे जाणार, वकिलांचा सल्ला घेऊन अपिलामध्ये जाऊ’, असं अजित पवार म्हणाले होते.

हे ही वाचा :

जरंडेश्वर प्रकरण A टू Z, अजित पवार ED च्या रडारवर का आहेत? सोपं कारण

काय आहे जरंडेश्वर कारखाना प्रकरण, अजित पवारांचा नेमका संबंध काय? 

Published On - 12:04 pm, Tue, 10 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI