तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी तरीही बेकायदेशीर वाहतूक, इचलकरंजी पोलिसांच्या एकाला बेड्या

इचलकरंजी शहरात बंदी घालण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थाची (Ichalkaranji Police Arrest One) बेकायदेशीरपणे वाहतुक प्रकरणी गावभाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

तंबाखुजन्य पदार्थांवर बंदी तरीही बेकायदेशीर वाहतूक, इचलकरंजी पोलिसांच्या एकाला बेड्या
Ichalkaranji Police

इचलकरंजी : इचलकरंजी शहरात बंदी घालण्यात आलेल्या गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थाची (Ichalkaranji Police Arrest One) बेकायदेशीरपणे वाहतुक प्रकरणी गावभाग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. संदीप माळी असे त्याचे नाव असून त्याच्याकडून गुटखा, सुगंधी सुपारी आणि दुचाकी असा 98 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Maharashtra Crime News Ichalkaranji Police Arrest One In Case Of Transporting Gutkha Illegally).

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तंबाखुजन्य पदार्थांचा साठा आणि तसेच वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा नदी ते झेंडा चौक या मार्गावरुन अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार नदीवेस नाका, मरगुबाई मंदीरसमोर सापळा लावत वाहनांची तपासणी सुरु केली. त्यावेळी संदीप माळी याची दुचाकी संशयावरुन थांबविण्यात आली. दुचाकीवरील पोत्याची तपासणी करता त्यामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी 54 हजार रुपयांचा मुद्देमाल आणि दुचाकी असा 98 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कोल्हापुरात19 लाखांचा गुटखा पकडला

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 19 लाखांचा गुटखा जप्त केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी एका टेम्पोवर कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 19 लाख 50 हजार रुपये किमतीचा गुटका व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विविध कंपन्यांचा गुटखा जप्त

जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीररित्या टेम्पो मधून विविध कंपन्यांच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. बेळगावहून विमल कंपनीचा पान मसाला ,वर्ल्ड कंपनीची सुगंधी तंबाखू ,आर एम डी पानमसाला घेऊन जात असलेला टेम्पो पकडण्यात आला. गुटख्याची टेम्पोतून वाहतूक सुरु असताना ही कारवाई झाली.

Maharashtra Crime News Ichalkaranji Police Arrest One In Case Of Transporting Gutkha Illegally

Published On - 3:56 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI