Sanjay Biyani Murder | बियाणी कुटुंबाला धमकवणारा सापडला, वैयक्तिक भांडणाचा वचपा काढण्यासाठी पत्र

बियाणींना जीवे ठार मारण्याचा प्लॅन परभणीत झाल्याचा दावा या पत्रात करण्यात आला होता. या पत्रात रेती माफियांचा उल्लेख करण्यात आला होता. हे निनावी पत्र स्पीड पोस्टने आलं होतं, तर पत्रात लिहिलेला मजकूर हिंदी भाषेत होता.

Sanjay Biyani Murder | बियाणी कुटुंबाला धमकवणारा सापडला, वैयक्तिक भांडणाचा वचपा काढण्यासाठी पत्र
संजय बियाणींच्या कुटुंबीयांना आलेलं निनावी पत्रImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:46 AM

नांदेड : नांदेड शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर (Sanjay Biyani Murder Case) घरी निनावी पत्र (Letter) पाठवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. धर्माबाद येथील आटाळा येथून 74 वर्षीय विठ्ठल सूर्यवंशी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सूर्यवंशीचा गावातील पांडुरंग येवले नामक व्यक्तीशी शेतीच्या कारणावरुन वाद (Nanded Crime) होता. त्यामुळे येवले यांच्या नावाचा उल्लेख करुन सूर्यवंशीने पत्र पाठवल्याचा आरोप आहे. येवले यांना गुन्हात अडकवण्यासाठी खोडसाळपणाने पत्र पाठवल्याची कबुली सूर्यवंशीने दिल्याचं समोर आलं आहे. बियाणींना जीवे ठार मारण्याचा प्लॅन परभणीत झाल्याचा दावा या पत्रात करण्यात आला होता.

बियाणींना जीवे ठार मारण्याचा प्लॅन परभणीत झाल्याचा दावा या पत्रात करण्यात आला होता. या पत्रात रेती माफियांचा उल्लेख करण्यात आला होता. हे निनावी पत्र स्पीड पोस्टने आलं होतं, तर पत्रात लिहिलेला मजकूर हिंदी भाषेत होता.

काय होतं पत्र?

बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुवा, जिसमे आनंद नगर से बहुत बडा दादा पांडुरंग येवले परभणी आया था…. जिसेने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नही करते… अशा आशयाचे निनावी पत्र संजय बियाणी यांच्या घरी धडकले होते. त्यामुळे आधीच दहशतीच्या छायेत वावरत असणारे बियाणी कुटुंबीय या पत्रामुळे आणखी भयभीत झाले होते.

काय आहे प्रकरण?

5 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास नांदेडमधील सुप्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर राहत्या घराबाहेरच चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गोळीबारात संजय बियाणी गंभीर जखमी झाले होते, मात्र रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. खंडणी वसुलीच्या कारणावरुन त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे, तर सुपारी देऊन पतीची हत्या झाल्याचा आरोप बियाणींच्या पत्नीने केला आहे. संजय बियाणींवरील गोळीबाराचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केल्याचं कॅमेरात कैद झालं आहे.

संबंधित बातम्या :

बिल्डर Sanjay Biyani हत्याकांडाचे गूढ उकलणार? बियाणींचा गहाळ मोबाइल सापडला, तपासाकडे महाराष्ट्राचे लक्ष!

Sanjay Biyani हत्याकांड, नांदेड एकटवटलं, अंत्ययात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटकेची मागणी

Sanjay Biyani | घराबाहेर गोळीबार ते बायकोचे आरोप, 10 मुद्द्यात बिल्डर संजय बियाणी हत्या प्रकरण घ्या समजून

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.