Sangli Crime | सांगलीत कारमध्ये तब्बल 75 लाखांची रोकड जप्त, तिघा संशयितांची चौकशी

सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिदकर आणि पोलीस पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेल समोर हा प्रकार घडला.

Sangli Crime | सांगलीत कारमध्ये तब्बल 75 लाखांची रोकड जप्त, तिघा संशयितांची चौकशी
सांगलीत 75 लाखांची रोकड जप्त
Image Credit source: टीव्ही 9
शंकर देवकुळे

| Edited By: अनिश बेंद्रे

May 10, 2022 | 2:22 PM

सांगली : सांगलीत चारचाकी गाडीत (Sangli Crime News) तब्बल 75 लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिदकर आणि त्यांच्या पोलीस पथकाने ही मोठी कारवाई केली. सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेल (City Palace Hotel) समोर ही कारवाई करण्यात आली. सोमवारी रात्री रोकड जप्तीची कारवाई (Cash Detained) करण्यात आली. कारवाईमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी चारचाकी गाडी सह रोख रकम 75 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. तिघांच्या कडे कसून चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

आगामी सांगली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर चारचाकी गाडीत तब्बल 75 लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिटी पॅलेस हॉटेल समोर कारवाई

सांगली शहर पोलीस निरीक्षक अजय सिदकर आणि पोलीस पथकाने सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केली. सांगलीतील सिटी पॅलेस हॉटेल समोर हा प्रकार घडला.

तिघा संशयितांची कसून चौकशी सुरु

सांगली जिल्ह्यात घडलेल्या या कारवाईमुळे हडकंप माजला आहे. पोलिसांनी चारचाकी गाडीसह 75 लाख रुपयांची रोख रकम ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी तिघा संशयितांकडे कसून चौकशी सुरु केली आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें