AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane Death : वैष्णवीला शशांकशी लग्न करून पश्चात्ताप झाला होता?, मामाजवळ अखेरचं काय म्हणाली?; धक्कादायक माहिती उघड

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने हुंड्याच्या छळामुळे आत्महत्या केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी आहे. तिच्या आई-वडिलांनी सासऱ्यांवर हुंड्यासाठी छळ करण्याचा आरोप केला आहे. वैष्णवीने आधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे लव्ह मॅरेज झाले होते, पण लग्नानंतर तिचा सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. या प्रकरणात महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहेत आणि वैष्णवीचा पती राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आला आहे.

Vaishnavi Hagawane Death : वैष्णवीला शशांकशी लग्न करून पश्चात्ताप झाला होता?, मामाजवळ अखेरचं काय म्हणाली?; धक्कादायक माहिती उघड
वैष्णवीला लग्न केल्याचा झाला होता पश्चाताप ?Image Credit source: social media
| Updated on: May 22, 2025 | 11:38 AM
Share

पुण्यातील मुळशी तालुक्यातील विवाहीत महिला वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ माजली आहे. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला होता. याप्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत असून अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. यापूर्वीदेखील वैष्णवीने जीव देण्याचा प्रयत्न केला होता. जेवणार विष कालवून ते खात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती एफआयआरमधून समोर आली होती.

वैष्णवीचं शशांकशी लव्ह मॅरेज झालं होतं, घरच्यांचा विरोध पत्करूनही ती हे लग्न करण्यास तयार होती. कस्पटे कुटुंब ( वैष्णवीचे आई-वडील) यांचा या लग्नाला विरोध होता. मात्र ती या लग्नाच्या निर्णयावर ठाम होती, असं वैष्णवीच्या मामांनी सांगितलं. मला त्याच्या सोबतच लग्न करायचं आहे, असं ती वारंवार म्हणायची. त्या लोकांनी तिच्यावर काय जादूटोणा केला होता,  ते माहीत नाही, एवढं संमोहित केलं होतं की तिने शशांकशीच लग्न करण्याचा ध्यास घेतला होता, असं तिचे मामा म्हणाले.

लग्न केल्याचा पश्चाताप झाला ?

अखेर इतर कुटुंबियांनी समजूत घातल्यावर कस्पटे कुटुंब या लग्नासाठीतयार झाले आणि वैष्णवी-शशांकचा थाटात विवाह झाला. लग्नात 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी असा भला मोठा हुंडा दिला होता, तरीही हगवणे कुटुंबियांची हाव सुटेना. त्यापायी तिला मारहाण करण्यात आली होती, तिचा बराच छळ होत होता असे म्हणत हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचा आरोप वैष्णवीच्या मामांनी केलाय

या घरातच त्यांच्या लग्नची बैठक झाली. त्यावेळीच आनंद कस्पटे (वडिल) म्हणाले की मला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही. मात्र तरीही हगवणे कुटुंबियांनी भांडून मोठी गाडी घेतली. आम्ही त्यांच्यासाठी MG हेक्टर गाडी बुक केली होती, पण त्यांनी भांडण सुरू केलं आणि ती गाडी कॅन्सल करत फॉर्च्युनरच द्या अशी मागणी केली. माझ्यासोबत भिकारी पोरं फिरतात, त्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत. त्यामुळे मला फॉर्च्युनरच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. सोन्याची पण तशीच मागणी झाली असं मामांनी सांगितलं.

त्यांनी 1 लाख 20 हजाराचा घड्याळ मागवून घेतलं, असंही ते म्हणाले. पण 6 महिन्यांनी एकेक गोष्टी समोर येऊ लागल्या,कानावरही आल्या. तिचा छळ झाला, तेव्हा मी वैष्णवीला विचारलं की हा काय प्रकार आहे ? तेव्हा वैष्णवी म्हणाली, मामा माझी चूक झाली, म्हणजे तिने घेतलेला निर्णय, त्या निर्णयाचा तिला पश्चाताप होत होता, असं मामांनी नमूद केलं.

लाडक्या बहिणीला न्याय द्या, अजित पवारांकडे मागणी

वैष्णवी आणि शशांकच्या लग्नासाठी अजित पवारही उपस्थित होते. फॉर्च्युनर गाडीची किल्ली त्यांच्या हस्तेच वध-वरांना देण्यात आली होती. तेव्हा अजित पवारांनी वैष्णवीच्या बाबांना एक प्रश्नही विचारला होता, तुम्ही गाडी दिली का राजेंद्र हगवणे यांनी तुमच्याकडे गाडी मागितली होती ? त्यांच्या या शब्दातंच सगळं काही आल्याचं मामा म्हणाले. आता आमची अजित पवारांकडे एकच मागणी आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या. ! हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे,वैष्णवीला त्यांनी मरण्यासाठी प्रवृत्त केले, असा आरोपही तिच्या मामांनी केला.

महिला आयोगाचे चौकशीचे आदेश

दरम्यान या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारे दखल घेतली असून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितलं.

वैष्णवी यांचा पती राष्ट्रवादीतून निलंबित

दरम्यान वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर तिचा पती शशांक याला राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलं आहे. वैष्णवीचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार नसताना स्वतः दखल घेऊन आम्ही याप्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. वैष्णवी हगवणे यांचे सासरे पक्षाचे पदाधिकारी नाहीत. वैष्णवी यांचे पती आमच्या पक्षाचे सदस्य होते मात्र त्यांना आम्ही निलंबित केले आहे,असे रुपाली चाकणकर म्हणाल्या.

याप्रकरणी आम्ही 19 मे रोजीच तक्रार दाखल केली असून आयोगाचे काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. राजेंद्र हगवणे यांची कन्या करिष्मा हिने 6 नोव्हेंबर 2024 रोजी स्वतःच्या कुटुंबातील काही लोकांवर विरोधात आमच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारची दखल घेतली कारवाई करण्याची सूचना आम्ही पोलिसांना दिली होती. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो, गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे बजावले.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.