AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निलेश लंकेना मोठा धक्का, पीएवर झाला जीवघेणा हल्ला

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला. आता खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

निलेश लंकेना मोठा धक्का, पीएवर झाला जीवघेणा हल्ला
| Updated on: Jun 06, 2024 | 2:18 PM
Share

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिणमधून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला. आता खासदार निलेश लंके यांना मोठा धक्का बसला आहे. लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यांच्या या विजयाला अवघे दोन दिवसही उलटत नाहीत तोच त्यांच्या पीएवर जीवघेणा हल्ला झाला आहे. राहुल झावरे यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पारनेर येथील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय १० ते १२ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारची तोडफोड करून राहिल यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल झावरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लवकरच नगर येथे त्यांना हलवण्यात येणार आहे.

निलेश लंके हेही लवकरच राहुल यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. या हल्ल्यामुळे गावातील वातावरण अतिशय तापलं असून तणावपूर्ण परिस्थिती आहे. मात्र हे हल्लेखोर नेमके कोणे होते, राहुल यांच्यावर हा हल्ला का झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्याने ते बरेच चर्चेत आले होते. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. मात्र शरद पवार गटात आल्यावर त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आणि अमहदनगरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत लंके यांना 6 लाख 24 हजार 707 इतकी मतं मिळाली. तर भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्या पारड्यात 5 लाख 95 हजार 868 मतं पडली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.