कोल्हापूरामध्येही पुण्याची पुनरावृत्ती, भरधाव कारने 6 जणांना चिरडलं
पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण गाजत असतानाच आता कोल्हापूरमध्येही अशाच एका अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. कोल्हापूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने 6 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

पुण्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण गाजत असतानाच आता कोल्हापूरमध्येही अशाच एका अपघाताची पुनरावृत्ती झाली आहे. कोल्हापूरमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या कारने 6 जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमधील सायबर चौकात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. कोल्हापूरमधील सायबर चौकात भरधाव वेगाने एक कार आली. आणि रस्त्यावरील बाईकस्वारांना चिरडत पुढे जाऊन धडकली आणि उलटली. या कारच्या धडकेमुळे रस्त्यावरील ६ ते ७ बाईक्सना धडक बसली आणि बाईकस्वार खाली पडले. त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये कार चालकाचाही समावेश आहे. या अपघाताची अतिशय भीषण, अंगावर काटा आणणारी दृश्य समोर आली आहेत.
या अपघातात सहा जणांना चिरडणारी ती कार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरुंची असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात त्यांचादेखील मृत्यू झाला आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नव्हती. तरीदेखील त्यांनी कार चालवल्याची माहिती समोर येत आहे. कार चालवत असताना त्यांचा ताबा सुटला होता. त्यामुळे ही कार थेट दुचाकींवर जावून आदळली.
