AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : धक्का लागला म्हणून तिने प्रवाशाला छत्रीने झोडपले, प्रवासी ट्रॅकवर पडला अन्… सीसीटीव्हीतील धक्कादायक दृष्य पाहून सर्वच हादरले

Mumbai Accident : रेल्वे स्टेशनवर उभं असताना एका महिलेला धक्का लागल्याने एका इसमाला बेदम मारहाण करण्यात आली. प्लॅटफॉर्मच्या टोकावर उभा असलेला तो इसम अचानक खाली कोसळला. तेवढ्यात समोरून ट्रेन..

Mumbai Crime : धक्का लागला म्हणून तिने प्रवाशाला छत्रीने झोडपले, प्रवासी ट्रॅकवर पडला अन्... सीसीटीव्हीतील धक्कादायक दृष्य पाहून सर्वच हादरले
| Updated on: Aug 17, 2023 | 10:57 AM
Share

मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत (mumbai crime) एका हैराण करणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनवर (sion station) एका इसमाचा महिला प्रवाशाशी वाद झाला. मात्र त्या भांडणाचा हिंसक आणि दुःखद अंत झाला. पत्नीला धक्का लागल्याचे पाहून तिचा पती त्या इसमाशी भांडू लागला, त्याला मारहाणही केली. त्या दरम्यान मध्येच त्या इसमाचा तोल गेल्याने तो रेल्वे ट्रॅकवर कोसळला आणि समोरून वेगाने आलेल्या ट्रेनखाली (hit by train) सापडून त्याचा अंत झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश राठोड असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी शासकीय रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अविनाश माने (३१) आणि शीतल माने (३०) या आरोपी जोडप्याचा शोध घेत एक दिवसानंतर त्यांना अटक केली. मृत दिनेश राठोड हा नवी मुंबईतील घणसोली येथील रहिवासी असून तो बेस्ट (BEST)मध्ये नोकरी करत होता. सोमवार (13 ऑगस्ट) रोजी सायन रेल्वे स्टेशनवरी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या पथकाने नंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्या फुटेजनुसार, राठोड हा १ नंबर प्लॅटफॉर्म वरून चालत होता व तो महिलांच्या डब्याजवळील जागेवर उभा राहिला. काही मिनिटांनी त्याचा एका महिलेला धक्का लागला असता, तिने त्याला छत्रीने मारायला सुरूवात केली. तिचा पती स्टेशनवर , पुढे काही अंतरावर उभा होता. त्याने हा प्रकार पाहिला व तोही मध्ये पडला.

अपघातानंतर ते जोडपं झालं गायब

त्याने राठोडयाला पकडून त्याच्या तोंडावर एका तडाखा दिला. मात्र ही धडक एवढी भीषण होती की राठोड याचा तोल गेला व रेल्वे ट्रॅकवर कोसळला. त्याच्या दिशेने एक ट्रेन येत होती हे पाहून राठोडने पटकन प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला आणि ट्रेनखाली आला, असे त्या फुटेजमध्ये दिसले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ते जोडपं तिथून लगेच पळून गेलं.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि 15 ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेने त्यांना शोधून काढत त्यांना अटक केली. अविनाश हा हाउसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो तर शीतल ही गृहिणी असून ते दोघे मानखुर्द येथे राहतात, असे पोलिसांनी सांगितले. त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच