पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या, नंतर थेट पोलिसांना कॉल, म्हणाला….

देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपली पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. या हत्येमागे फार काही मोठं कारण नाही. पण तरीही आरोपीने रागाच्या भरात आपल्या पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडून हत्या केली.

पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या, नंतर थेट पोलिसांना कॉल, म्हणाला....
चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपली पत्नी आणि सासूची हत्या केली आहे. या हत्येमागे फार काही मोठं कारण नाही. पण तरीही आरोपीने रागाच्या भरात आपल्या पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे आरोपीने दोघांची हत्या केल्यानंतर पोलिसांना समोरुन फोन केला. पोलिसांना त्याने आपण आपल्या पत्नी आणि सासूची हत्या केल्याची कबुली दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

हत्येमुळे परिसरात एकच खळबळ

संबंधित घटना ही दिल्लीच्या हरिदास नगर परिसरात नारनूम पार्क येथे घडली. आरोपीचं नाव महेश असं असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याच्या मृतक पत्नीचं नाव निधी (वय 21) आणि मृतक सासूचं वीरो (वय 55) असं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आपल्या पत्नी आणि सासूसोबत इतकं निर्घृणपणे कसा वागू शकतो? असा प्रश्न स्थानिकांकडून व्यक्त केला जातोय.

आरोपीने हत्या का केली?

दरम्यान, या घटनेमागील नेमकं कारण काय? असा प्रश्न अनेकांना सतावत होता. पण पोलिसांनी केलेल्या तपासात खरं कारण समोर आलं आहे. आरोपी आपल्या पत्नी आणि सासूवर नाराज होता. कारण त्या दोघी त्याला घरजावाई म्हणून सारख्या हिणवत असायच्या. त्यामुळे रागात त्याने आपल्या पत्नी आणि सासूची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघांच्या हत्येनंतर त्याने पोलिसांना कॉल करत आपल्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतलं. तसेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पाच वर्षांपूर्वी लग्न

आरोपी महेश हा कार खरेदी-विक्रीच्या दलालीचं काम करतो. त्याचं पाच वर्षांपूर्वी निधीसोबत प्रेमविवाह झाला होता. तो आपल्या सासूच्या घरी पत्नीसह राहत होता. त्यामुळे सासू आणि पत्नीकडून त्याला वारंवार घरजावई म्हणून हिणवलं जात होतं. अखेर आरोपीने रागात दोघांची हत्या केली.

उत्तर प्रदेशात साधूची हत्या

दरम्यान, उत्तर प्रदेशातही एक हत्येची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील कोतवाली ग्रामीण भागातील नागला जगरुप गावाची आहे. गढी तालुक्यातील रहिवासी असलेले 52 वर्षीय साधू किरपाल सिंह हे एका महिन्यापूर्वीच मंदिरात राहायला आले होते. काल रात्री आरोपी तरुण त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर आरोपीने साधू किरपाल सिंह यांची कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण हत्या केली आणि घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप आहे. गावातील लोक सकाळी मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेले असता साधूचा मृतदेह मंदिराच्या आवारात पडलेला आढळला.

आरोपीकडून हत्येची कबुली

साधूच्या हत्येची बातमी मिळतातच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक उदय शंकर सिंह हे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी आले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपीने साधूची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

वीस वर्षांपासून संधीची प्रतीक्षा

20 वर्षांपूर्वी साधू किरपाल सिंह यांनी आपल्या वडिलांचा खून केला होता, ज्याचा बदला घेण्यासाठी मी गेल्या 20 वर्षांपासून वाट पाहत होतो, असा दावा आरोपीने केला आहे. जेव्हा मला एका साधूच्या वेशात मंदिरात राहणाऱ्या किरपालबद्दल कळले तेव्हा त्याच्याशी मैत्री करुन संधी मिळताच मी त्याचा खून केला, असा दावाही त्याने केला.

हेही वाचा :

आपलं कोण..परकं कोण? नातवाच्या मित्राचाच आजीच्या सोन्यावर डल्ला, औरंगाबादेत सुशिक्षित तरुणाचा प्रताप

नाशिकमध्ये बँक मॅनेजरने 14 लाख हडपले; ग्राहकाची पंचवटी पोलिस ठाण्यात धाव, गुन्हा दाखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI