संशयाची सुई, त्यानं बायकोवर भर रस्त्यात चाकुचे सपासप वार केले, लोक काय करत होते?

संशयाची सुई, त्यानं बायकोवर भर रस्त्यात चाकुचे सपासप वार केले, लोक काय करत होते?
सांकेतिक फोटो

एका व्यक्तीने भर दिवसा बाजारात त्याच्याच पत्नीच्या पाठीवर सपासप चाकूने वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Man openly killed his wife in Delhi Market).

चेतन पाटील

|

Apr 10, 2021 | 11:45 PM

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली एका भयानक घटनेने हादरली आहे. एका व्यक्तीने भर दिवसा बाजारात त्याच्याच पत्नीच्या पाठीवर सपासप चाकूने वार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे यावेळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती. मात्र, कुणीही महिलेला वाचवण्यासाठी पुढे धजावलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत (Man openly killed his wife in Delhi Market).

पत्नीवर 25 वेळा वार

संबंधित घटना ही शनिवारी (10 एप्रिल) दुपारी दिल्लीच्या बुद्ध विहार भागात जवळपास दीड वाजेच्या सुमारास घडली. आरोपी हरीश हा एका मॅरेज ब्यूरोमध्ये काम करतो. तो पत्नीसोबत दुपारी बाजारात निघाला होता. मात्र, अचानक रस्त्याने चालताना त्याच्या मनात संशायाची पाल चुकचुकली आणि त्याने पत्नीच्या पाठीवर चाकूने वार करण्यास सुरुवात केला. खरंतर हा सर्व प्रकार त्याने आधीच कट रचून केल्याची शक्यता आहे. त्याने आपल्या 26 वर्षीय पत्नीच्या शरीरावर तब्बल 25 वेळा वार केले. या हल्ल्यात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

आरोपी हरीशला अटक

आरोपी हरीश हा त्याच्या पत्नीवर नेहमी संशय घ्यायचा. याच संशयातून त्याने पत्नीची हत्या केली. त्याने पत्नीवर इतके भीषण वार केले की, ही घटना बघता असताना बाजारातील लोकांच्या काळजाचे ठोके चुकले. पत्नीच्या मृत्यूनंतरही तो तिच्यावर वार करत राहिला. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी हरीशला अटक केली.

घटनेच्या वेळी बघणाऱ्यांनी व्हिडीओ बनवले

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी भर दिवसा रस्त्यावर त्याच्या पत्नीवर चाकूने निघृणपणे वार करत होता तेव्हा काही लोक या घटनेचा व्हिडीओ बनवत होते. आरोपीने पत्नीची हत्या केली तेव्हा बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली. मात्र, त्यापैकी कुणीही महिलेचा जीव वाचवण्यासाठी पुढे आलं नाही (Man openly killed his wife in Delhi Market).

पोलिसांच्या तपासात काय समोर आलं?

अखेर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा ते तिथे आले. पोलिसांनी केलेल्या तपासात मृतक महिलेचं नाव नीलू असं असल्याचं समोर आलं. तिचा पती तिच्यावर सारखा संशय घ्यायचा. तिचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध आहेत, असा संशल त्याला होता. यातून दोघी पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद झाल्याचंही समोर आलं आहे. हे दाम्पत्य मुळचं गुजरातचं होतं. ते दिल्लीत बुद्ध विहार येथील फेज 1 मध्ये राहत होते, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली.

हेही वाचा : राजस्थानात पतीची कंपनी, पाच कोटींचा टर्नओव्हर, तरीही दीरावर जीव भाळला, सुपारी देऊन पतीचाच काटा काढला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें