Insta वर शेजारणीला Hi करणं महागात, डोक्याला थेट 7 टाके, असं घडलं तरी काय ?
एका तरुणाला त्याच्या शेजारणीला इंस्टाग्रामवर 'हाय' मेसेज पाठवणं खूप महागात पडलं. एका मेसेजची त्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. असं घडलं तरी काय त्याच्यासोबत काय घडलं ?

आजकाल लोक सोशल मीडियावर अनोळखी लोकांशीही संवाद साधू लागले आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मित्र बनवणे ही एक साधी, कॉमन गोष्ट झाली आहे. पण कधीकधी अती मैत्री करणंही महागात पडू शकतं. इन्स्टाग्रामवर एक साधा “हाय” संदेश पाठवणे इतके महागात पडेल अशी एका तरुणाने कधीच कल्पना केली नव्हती. तरूणाने महिलेला साधा ‘हाय‘ मेसेज पाठवला. पण त्यानंतर थोड्या वेळाने त्या महिलेचे घरचे आणि साथीदारांनी येऊन त्या तरूणाला बदड बदड बदडलं, एवढी मारहाण केली की तो गंभीर जखमी झाला. त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील खंडवा येथील मोघाट रोड पोलिस स्टेशन हद्दीतील अहमदपूर खैगाव गावात ही अजब घटना घडली. दिनेश पाल असे जखमी तरुणाचे नाव आहे. दिनेशला रविवारी सुट्टी होती आणि तो घरी होता. तेव्हा मोबाईल पाहताना त्याने शेजारच्या महिलेला इन्स्टाग्रामवर फॉलो केलं. ती महिला बऱ्याचदा दिनेशच्या पोस्ट लाईक करायची. जेव्हा त्या महिलेने त्याला फॉलो केलं तर त्याेवही सोशल मीडियावर तिला फॉलोबॅक केलं. आणि त्यानंतर त्याने तिला फक्त ‘Hii’ असा मेसेज केला.
तरूणाला बेदम मारहाण
त्यानंतर थोडावेळ त्याने फोन वापरला. तिथून तो शेतावर काम करण्यासाठी गेला. मात्र तो शेतावर पोहोचल्यावर थोड्याच वेळात शेजारणीच्या घरातले काही लोकं आणि त्यांचे साथीदार तिथे शेतावर आले आणि त्यांनी मारहाण करायला सुरूवात केली असं तरूणाने फिर्यादीत नमूद केलं. त्यांनी तरूणाचं काहीएक ऐकून घेतलं नाही, फक्त मारतच राहिले. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दिनेशला तरुणांपासून वाचवले.
डोक्याला पडले सात टाके
त्यानंतर दिनेशला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी दिनेशवर उपचार केले. मात्र त्याला एवढं लागलं होतं की त्याच्या डोक्याला 7 टाके पडले. एवढंच नव्हे तर दिनेशचे हात आणि पायही फ्रॅक्चर झाले आहेत. हल्लेखोरांनी तरुणावर काठ्या आणि रॉडने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असं पोलिसांनी सांगितलं
इंस्टाग्रामवर पत्नीला मेसेज केला
याप्रकरणी आरोपी सूरज याने जखमी दिनेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दिनेशने माझ्या पत्नीला इन्स्टाग्रामवर हाय मेसेज केला. दिनेश हा माझ्या पत्नीला त्रास देतो, असा आरोपही त्याने केला.या प्रकरणी दोन्ही पक्षांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी सूरजची तक्रार देखील नोंदवून घेतली आहे आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.
