AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 लाख रुपये दिले, सोने दिले… नवरदेवाने वरमाला गळ्यात टाकली अन् नवरीने मात्र दुसऱ्याच दिवशी… काय घडलं आळंदीत?

बाबू गोरख मत्रे याला लग्न करण्याची इच्छा होती, लग्न करून देण्यासाठी त्याच्याकडून तब्बल 5 लाख रुपये उकळण्यात आले. बाबूच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर या दोघांनीच त्याची फसवणूक केली.

5 लाख रुपये दिले, सोने दिले... नवरदेवाने वरमाला गळ्यात टाकली अन् नवरीने मात्र दुसऱ्याच दिवशी... काय घडलं आळंदीत?
लग्न लावतो सांगत 5 लाखांची फसवणूक
| Updated on: Jan 30, 2025 | 2:19 PM
Share

शादी का लड्डू, जो खाए वो पछताए, जो न खाए वो ललचाए… अशी एक म्हण आहे. लग्न कराव, सेटल व्हावं अशी अनक लोकांची इच्छा असते. काही जण प्रेमविवाह करतात, पण काही लोक अरेंज मॅरेजचा मार्ग निवडतात, त्यासाठी विवाह मंडळात नावही नोंदवलं जातं.मात्र लग्नाच्या नावाखाली विवाहोत्सुक, लग्नाळू तरूणांना फसवून त्यांचे पैसे लुबाडणारी टोळी अहिल्यानगर जिल्हात सक्रिय झाली आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेक टोळ्यांचा पर्दाफाश केला आहे. मात्र तरी सुद्धा अनेक लग्नाळू तरुण अश्या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांना बळी पडत आहे. अशीच एक घटना अहिल्यानगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे घडली असून तेथे एका तरूणाची फसवणूक करण्यात आली आहे. त्याला तब्बल 5 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबू गोरख मत्रे ( वय 28 वर्ष) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव असून लग्न करून देण्यासाठी त्याच्याकडून तब्बल 5 लाख रुपये उकळण्यात आले. बाबूच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर या दोघांनीच त्याची फसवणूक केली. 15 जून 2024 रोजी बाबू मत्रे या तरुणाचे स्नेहा चव्हाण या मुलीसोबत लग्न लावून दिले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीने नवरदेवाच्या घरून धूम ठोकली आणि ती फरार झाली.

अनेक दिवसांपासून बाबू म्हात्रे लग्नासाठी मुलीच्या शोधात होता अशातच त्याला त्याच्या ओळखीचे लग्न लावून देणारे एजंट बापू काटे आणि नाना कात्रजकर हे भेटले. त्यावेळी त्यांनी लग्नासाठी पाच लाख रुपये लागतील असे सांगण्यात आले. त्यावेळी नवरदेव बाबू मत्रे याच्याकडून सर्व तयारी करण्यात आली. आळंदी येथे दोघांचेही लग्न लावून देण्यात आले. मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलीने धूम ठोकली. लग्न आणि भावी आयुष्याची सुखस्वप्न पाहणाऱ्या बाबूने आपले लग्न लावून देण्यासाठी एजंट आणि मुलीकडच्या फसवणाऱ्या टोळीला एकूण 3 लाख 60 हजार रुपये तसेच दोन तोळे सोने दिले होते. मात्र लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी फरार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बाबूने खर्डा पोलीस ठाण्यात नवरी मुलगी आणि तिच्यासोबत आलेल्या टोळीविरोधात फिर्याद नोंदवली. त्या आधारे खर्डा पोलिस स्टेशमध्ये दोन एजंट, मुली सोबत आलेली एक करवलीरी, आणि लग्न जमवून देणारी महिला अशा 5 जणांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.