Video: भविष्य मालिकांमधली ती भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावरील पक्षांच्या थव्याने खळबळ
Video: जगन्नाथ मंदिराच्या कळसावर घारींच्या थव्याने फेऱ्या मारल्या. कळसावर घारींचा थवा बसलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भविष्यात काही तरी मोठी घडटना घडणार असल्याचे म्हटले आहे.

ओडिसाच्या पुरी जगन्नाथ धाम मंदिराच्या कळसावर गेल्या शुक्रवारी घारींच्या थव्याने घिरट्या घातल्या. तसेच काही घारी या कळसावर बसलेल्या दिसत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वत्र खळबळ माजली आहे. स्थानिक लोकांनी हा व्हिडीओ पाहून भविष्यात काही तरी भयानक घडणार असल्याचे हे संकेत आहेत असे म्हटले आहे. काही लोक याला भगवानाचा दिव्य संकेत मानतात तर काही चेतावणी, तर मंदिर अधिकाऱ्यांच्या मते ही फक्त एक नैसर्गिक घटना आहे, ज्याने या क्षणाला शकुन, विश्वास आणि नीलचक्राशी संबंधित रहस्यांबद्दल वर्षानुवर्षांच्या चर्चेला पुन्हा हवा दिली आहे.
नेमका व्हिडीओ काय आहे?
काही दिवसांपूर्वी जगन्नाथ मंदिराच्या कळासावर घिरट्या घालणाऱ्या घारींच्या एका व्हिडीओने अनेक सिद्धांतांना जन्म दिला आहे, ज्याला लोक हिंदू धर्माच्या पौराणिक कथा, स्थानिक मान्यता आणि भविष्य मालिकेच्या चेतावणीशी जोडत आहेत. खरे तर भविष्य मालिका भविष्यवाण्यांशी संबंधित एक ग्रंथ आहे, जो १४०० च्या दशकात ओडिसाच्या ५ संतांनी, ज्यांना पंचसखा म्हणतात, भगवान जगन्नाथांच्या मार्गदर्शनाखाली लिहिला होता. भविष्य मालिका मूलतः ताडपत्रांवर लिहिलेले एक लिखाण आहे. त्यामध्ये भविष्यातील अनोळखी आणि रहस्यमयी घटनांचा उल्लेख आहे. यासोबतच यात कलियुगाच्या अंतापासून ते सत्ययुगाच्या सुरुवातीचा उल्लेख आहे.
View this post on Instagram
पक्ष्यांचे येणे नैसर्गिक आपत्तीचे संकेत
भविष्य मालिका ग्रंथानुसार, मंदिराच्या ध्वजावर वारंवार घारीसारख्या पक्ष्यांचे येणे नैसर्गिक आपत्ती किंवा युद्धासारख्या मोठ्या समस्येचे संकेत असू शकते. हे ऐकायला असामान्य वाटू शकते, पण मानले जाते की गरुडाच्या संरक्षणामुळे पक्षी मंदिराच्या आकाशात दिसत नाहीत. मंदिराच्या कळसावर घारींच्या फेऱ्या मारण्याला काही लोक अशुभ संकेत मानतात, तर काही लोक शुभ संकेत मानतात. कारण अनेक भक्त घारीला भगवान विष्णूंचे वाहन गरुडाशी जोडलेले पवित्र पक्षी मानतात. त्यांचे व्हायरल व्हिडीओबाबत मत आहे की, हे पक्षी मंदिरासाठी शुभ संकेत आणि आशीर्वाद घेऊन येतात.
व्हायरल व्हिडीओवर मंदिर अधिकाऱ्यांचे विधान
या घटनेबाबत मंदिर अधिकाऱ्यांचे विधानही समोर आले आहे. त्यांच्या मते घारींचे मंदिराच्या शिखरावर फेऱ्या मारणे फक्त एक नैसर्गिक घटना आहे. जी कुठेतरी सांगते की, या थिअरींशी संबंधित भविष्यवाण्या फक्त आजच्या काळात नैसर्गिक घटना असू शकतात.
