AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : सुटकेसमधून मृतदेहाचा पालघर ते गुजरात प्रवास, बॅग उघडताच पायाखालची जमीन सरकली; काय घडलं तिच्यासोबत?

पालघर येथे एका इसमाने लिव्ह- इन पार्टनरची हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहर पुन्हा हादरलं. याप्रकरणी आणखी माहिती समोर येत असून आरोपी हा विवाहीत होता, तरीही ...

Mumbai Crime : सुटकेसमधून मृतदेहाचा पालघर ते गुजरात प्रवास, बॅग उघडताच पायाखालची जमीन सरकली; काय घडलं तिच्यासोबत?
| Updated on: Sep 13, 2023 | 4:16 PM
Share

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : लिव्ह-इन पार्टनरची क्रूरपणे हत्या करून तिच्या मृतदेहाची (live in partner murder) विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने मुंबई पुन्हा हादरली. पालघरच्या नायगाव येथे ही धक्कादायक घटना घडली असून याप्रकरणी मनोहर शुक्ला (वय 43) या आरोपीला काल अटक करण्यात आली होती. मात्र आता या हत्याप्रकरणात (crime news) काळजाचा थरकाप उडवणारे नवनवे खुलासे होत आहेत. नयना ( 28) असे मृत तरूणीचे नाव असून तिला टबमध्ये बुडवून मारण्यात आले व नंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून तो गुजरातमध्ये फेकून देण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, यामध्ये आरोपीच्या पत्नीचाही समावेश होता, असेही समजते. या हत्याकांडामुळे मीरारोड येथील हत्याकांडाच्या भयानक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

५ वर्षांपासून होते रिलेशन

मिळालेल्या माहितीनुसार, नयना ही तरूणी नायगाव पूर्वेकडील सनटेक टॉवरमध्ये एकटीच रहायची.ती फिल्म इंडस्ट्रीत कामाला होती. तर तिची मोठी बहीण नालासोपारा येथील रहिवासी होती. गेल्या ५ वर्षांपासून नयना व आरोपी मनोहर शुक्ला हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र मनोहर हा विवाहीत असल्याचे नयनाला काही वर्षांपूर्वी समजले होते. त्यामुळे ती प्रचंड भडकली होती. तिने पोलिसांत शुक्ला याच्याविरोधात बलात्काराची तक्रारही दाखल केली होती. ती तक्रार मागे घ्यावी यासाठी शुक्ला हा तिच्यावर दबाव टाकत होता.

कसा उघडकीस आला गुन्हा ?

9 ऑगस्ट रोजी नयनाचा फोन अचानक बंद झाला. तिची मोठी बहीण जया हिने तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, नातेवाईक आणि ओळखीच्यांकडेही चौकशी केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. नयनाशी संपर्कर होऊ शकला नाही. अखेर 14 ऑगस्ट रोजी जया हिने नायगाव पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपली बहीण, नयना ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार तर लिहून घेतली पण त्यावर गंभीरपणे कारवाई केली नाही , असा आरोप करण्यात येत आहे. जया पोलिस स्टेशनला चकरा मारत राहिली. तिने पोलिसांना इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास तसेच मनोहरची चौकशी करण्यास सांगितले. तेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मनोहर हा एक जड सुटकेस घेऊन जाताना दिसला.

सूटकेसमध्ये सापडला मृतदेह

तर दुसरीकडे गुजरातमध्ये , पारडी पोलिसांना खाडीच्या किनाऱ्याजवळ एका सुटकेसमध्ये नयनाचा कुजलेला मृतदेह सापडला. तिच्या हातावरील टॅटूवरून नयनाची ओळख पटवण्यात आली. यानंतर पोलिसांनी मनोहर व त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, आपणच पाण्यात बुडवून तिची हत्या केल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर त्याने व त्याच्या पत्नीने तिचा मृतदेह सूटकेसमध्ये भरला आणि स्कूटरवरून ते गुजरातमध्ये गेले व एकेठिकाणी खाडीत ती सूटकेस फेकून दिली, अशी कबुलीही दिली.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....