AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mhada Exam: आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला, नवी तारीख म्हाडा ठरवणार

आज राज्यभरात म्हाडा भरतीचा पेपर होणार होता. दरम्यान, पेपर फुटण्या संदर्भातील तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहचल्या. त्यानंतर आव्हाडांनी रात्री ट्विट करून गृहमंत्र्यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. 565 जागांसाठी ही परीक्षा होणार होती.

Mhada Exam: आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला, नवी तारीख म्हाडा ठरवणार
पेपर फुटल्याने म्हाडा परिक्षा रद्द, नवी तारीख म्हाडा ठरवणार
| Edited By: | Updated on: Dec 12, 2021 | 9:33 PM
Share

पुणे : आरोग्य भरती परीक्षेचा खेळ खंडोबा सुरु असतानाच म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यावर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. तर विरोधीपक्ष असलेल्या भाजपने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारवर टिकेची झोड उठवलीय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून या सगळ्यांमध्ये क्लासचालकांचं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

आज राज्यभरात म्हाडा भरतीचा पेपर होणार होता. दरम्यान, पेपर फुटण्या संदर्भातील तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहचल्या. त्यानंतर आव्हाडांनी रात्री ट्विट करून गृहमंत्र्यांनी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. 565 जागांसाठी ही परीक्षा होणार होती.

परीक्षांची नवी तारीख म्हाडा ठरवणार

परीक्षांची नवी तारीख म्हाडा ठरवणार आहे. याच कंपनीने 2 लाख पोलिसांच्या परीक्षा घेतल्या होत्या आणि त्या व्यवस्थित पार पडल्या होत्या. पण यावेळी पोरांच्या आयुष्याचा होणारा खेळ थांबला आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच म्हाडा अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. म्हाडा पेपर फुटी आणि परीक्षा रद्द केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांना अटक करीत टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच यापुढे खाजगी संस्थांकडे न देता म्हाडा परीक्षा घेणार असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. शिवाय विद्यार्थ्यांची फी ही परत करणार असे आव्हाड म्हणाले.

शनिवारी रात्री पुणे पोलिसांनी केली कारवाई

शनिवारी रात्री जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर प्रितीश देशमुख आणि दोन एजंट विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच पुणे सायबर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठ्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपरफुटीमध्ये दलालांचे काही समान धागेदोरे समोर आल्याचं पोलिसांनी सांगितले.

एमपीएससी समन्वय समितीच्या तक्रारीनंतर प्रकार उघड

एमपीएससी समन्वय समितीच्या काही विद्यार्थ्यांनी म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटी संदर्भात सायबर सेलकडे तक्रार केल्यावर हा सगळा प्रकार उघड झाला. जी ए सॉफ्टवेअर कंपनीचे संचालक प्रितीश देशमुख, एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ, अजय चव्हाण, कृष्णा जाधव, अंकित चनखोरे या सहा जणांना अटक केली आहे. या सर्वांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पुणे न्यायालयाने दिले आहेत.

पेपरफुटीवर विरोधकांचा हल्लाबोल

या सगळ्या प्रकारात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत हल्ला चढवला आहे. या सगळ्यात केवळ क्लासचालक सहभागी आहेत असं म्हणून पोलिसांना हात वर करुन चालणार नाही. तर यातले बडे मासे शोधणं आवश्यक आहे. (MHADA exam canceled due to paper leaked, new date to be decided by MHADA)

इतर बातम्या

Mhada Paper Leak: आता यापुढे म्हाडाच सर्व परीक्षा घेणार, विद्यार्थ्यांना शुल्क परत करणार; जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : ‘म्हाडा’चाही पेपर फुटला! सीबीआय चौकशी करा, देवेंद्र फडणवीस आक्रमक

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.