Devendra Fadnavis : ‘म्हाडा’चाही पेपर फुटला! सीबीआय चौकशी करा, देवेंद्र फडणवीस आक्रमक

Devendra Fadnavis : 'म्हाडा'चाही पेपर फुटला! सीबीआय चौकशी करा, देवेंद्र फडणवीस आक्रमक
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 12, 2021 | 5:46 PM

मुंबई : आरोग्य विभागाच्या (Health Department) भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार आता समोर आलाय. त्यानंतर म्हाडाच्या (MHADA) परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलंय. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मध्यरात्री म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतलीय.

‘परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या, अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरु आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षेतही तीन-तीन वेळा परीक्षा रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरु आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरु आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही, याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे’, अशी आक्रमक भूमिक देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

नेमका प्रकार काय?

राज्यात विविध केंद्रावर आज ‘म्हाडा’च्या भरतीचा पेपर होणार होता. दरम्यान, पेपर फुटण्या संदर्भातील तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतर आव्हाडांनी रात्री उशिरा ट्विट करून ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. एकूण 565 जागांसाठी ही परीक्षा होणार होती.

पेपरफुटीचं प्रकरण उजेडात कसं आलं?

शनिवारी रात्री जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख आणि दोन एजंट विश्रांतवाडी परिसरात विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच पुणे सायबर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरती प्रकरणात अनेक बड्या अधिकाऱ्यांना अटक केली आहे. आरोग्य भरती आणि म्हाडा पेपरफुटीमध्ये दलालांचे काही समान धागेदोरे समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

आता म्हाडा स्वत: परीक्षा घेणार- आव्हाड

म्हाडा पेपरफुटी प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला. भविष्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात जी टोळी कार्यरत आहे, ती उध्वस्त करावी लागेल, यात पेपरफुटी नाही तर गोपनियतेचा भंग झाला आहे, असं आव्हाड म्हणाले. महाराष्ट्रमधील सर्व दलाल एकच आहेत, खाजगी सवस्थेकडून हा प्रकार झाला, त्यामुळे यापुढे म्हाडा स्वत: परीक्षा घेणार, खासगी संस्थेकडे देणार नाही, असंही आव्हाडांनी जाहीर केलंय. ज्यांच्याकडून फी घेतली आहे, त्यांची फी म्हाडा परत करणार आहे. काही नालायक लोकांना थारा देऊ नये. ही परीक्षा झाली असती तर काहींवर अन्याय झाला असता. विद्यार्थ्यांचे हीत महत्वाचे आहे. त्यामुळे मोठे रॅकेट पकडायला डिपार्टमेंट मागे लागले आहे. मागच्या सरकारवेळीही एमपीएसीचा पेपर फुटला होता, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या :

शिवसेना आणि भाजपमधील वाद वाढणार? बॅनरबाजीतून आमदार आशिष शेलारांची खिल्ली, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Thane : म्हणून म्हाडाची परीक्षा रद्द, पेपरफुटीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें