पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून नेलं, 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

Nalasopara rape news घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला नराधमांनी जबरदस्तीने उचलून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

  • विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, वसई विरार
  • Published On - 11:39 AM, 11 Jan 2021
पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून नेलं, 13 वर्षीय मुलीवर बलात्कार
गुन्हेगारी वृत्त

विरार : मुंबईजवळचं नालासोपारा पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने (Nalasopara rape case) हादरलं आहे. नालासोपाऱ्यात जीवे मारण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला नराधमांनी जबरदस्तीने उचलून नेलं. एका मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या टेम्पोत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मुलीच्या आरडाओरड्यामुळे ही घटना उघडकीस आली. मात्र तोपर्यंत बलात्कार करून आरोपी फरार झाले. (Minor girl raped in Nalasopara, near Mumbai)

ही धक्कादायक घटना शुक्रवारी 8 जानेवारीला रात्री 9 च्या सुमारास घडली. याप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसापासून बलात्कारासारख्या घटनांचं सत्र वाढलं आहे. नुकतंच औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरांमध्येही बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत.

औरंगाबादेत अल्पवयीन तरुणीवर गँगरेप

सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबादेत वाराणसीहून आलेल्या एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकही बलात्काराने हादरलं

नाशिकमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे. नाशिक रोड परिसरातील आरिंगळे मळ्यात ही धक्कादायक घटना घडली. चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची पीडितेच्या आईची तक्रार आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी 7 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पैठण तालुक्यात शेतवस्तीवर सामूहिक बलात्कार

यापूर्वी 8 डिसेंबर रोजी शेतवस्तीवर राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. पैठण तालुक्यातील थेरगावच्या पाचोड शिवारात ही घटना घडली होती. याप्रकरणात पाचोड पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

(Minor girl raped in Nalasopara, near Mumbai)

संबंधित बातम्या 

Gangrape | परराज्यातून आलेल्या अल्पवयीन तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या