VIDEO : प्रेयसीचं ऐकलं आणि काय झालं… आधी मारहाण, नंतर चपलेचा हार घालत गावात धींड, मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसातही नेलं

| Updated on: Oct 01, 2021 | 4:18 PM

प्रेयसीचं ऐकून व्हाट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवणं एका अल्पवयीन प्रियकराला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित अल्पवयीन तरुणाने आपल्या प्रेयसीसोबतचे फोटो स्टेटसला ठेवले होते. मात्र, याच गोष्टीचा राग प्रेयसीच्या आई-वडिलांना आला.

VIDEO : प्रेयसीचं ऐकलं आणि काय झालं... आधी मारहाण, नंतर चपलेचा हार घालत गावात धींड, मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसातही नेलं
प्रेयसीचं ऐकलं आणि काय झालं... आधी मारहाण, नंतर चपलेचा हार घालत गावात धींड, मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसातही नेलं
Follow us on

सोलापूर : प्रेयसीचं ऐकून व्हाट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवणं एका अल्पवयीन प्रियकराला चांगलंच महागात पडलं आहे. संबंधित अल्पवयीन तरुणाने आपल्या प्रेयसीसोबतचे फोटो स्टेटसला ठेवले होते. मात्र, याच गोष्टीचा प्रेयसीच्या आई-वडिलांना राग आला. त्यातून त्यांनी अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. तसेच ते मारहाण करुन थांबले नाहीत तर त्यांनी त्या मुलाची गावात धींड देखील काढली. यावेळी अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये घटना कैद करत सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ व्हायरल केले. या घटनेनंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर प्रियकराची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित प्रकरणातील अल्पवयीन प्रियकराचे एका 19 वर्षीय मुलीवर प्रेम होते. मात्र तिचे लग्न ठरले असल्यामुळे तिने दोघांचे फोटो मोबाईलच्या स्टेटसला ठेवण्यास सांगितले. जेणेकरुन त्यामुळे तिचं लग्न मोडेल आणि आपण लग्न करु, असे मुलीने तिच्या प्रियकराला भेटून सांगितले. त्यानंतर त्याने आपल्या प्रेयसीचे फोटो या अल्पवयीन प्रियकराने स्टेटसला ठेवले. त्याप्रमाणे त्याने स्टेटसला फोटो ठेवले. त्यामुळे दोघांचे फोटो व्हायरल झाले. परिणाम म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी अल्पवयीन प्रियकराला घरातून घेऊन जाऊन त्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलावर बाललैंगिक शोषण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत नेमकं काय?

संबंधित प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत प्रेयसीचे नातेवाईक मुलाला प्रचंड मारहाण करताना दिसत आहेत. तसेच मुलाच्या गळ्यात चपलेचा हार देखील टाकण्यात आला आहे. मुलीचे काही नातेवाईक मुलाला प्रचंड मारहाण करत आहेत. तर काहीजण मुलाला त्यापासून वाचवताना दिसत आहेत. मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला मारहाण करत धींड काढली. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी प्रियकर मुलाची रवानगी बालसुधारणगृहात केली आहे.

कोणतंही काम करताना विचार करा

हल्ली काही तरुण आंधळेपणाने आपल्या मित्र-मैत्रिणींवर विश्वास ठेवून नको ते कृत्य करुन बसतात. दुसऱ्याने काहितरी करायला सांगितलं तर ते मागचापुढचा विचार न करता ते करुन बसतात. पण त्यानंतर त्यांचं नुकसान होतं. तसेच पश्चात्ताप करण्याची वेळ येते. आपण कोणत्यावेळी काय निर्णय घ्यावा किंवी काय केलं पाहिजे याबाबत आपण इतरांना न विचारता स्वत: आत्मपरिक्षण करावे. आपण करत असलेल्या गोष्टीचे चांगले किंवा वाईट परिणाम काय होऊ शकतात, याचा विचार केला पाहिजे. संबंधित कृत्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो का याचा विचार करावा. तसेच जे नैतिक आहे तेच करावं. तसेच नैतिक गोष्टी करण्यासाठी नैतिक मार्गानेच संघर्ष करायला हवा. तरंच आपल्याला दुनिया सलाम करेल.

हेही वाचा :

उल्हासनगरात वालधुनी नदीत अज्ञात मृतदेह, परिसरात खळबळ, हत्या की आत्महत्या, गूढ कसं उलगडणार?

पुण्यात युवा बिल्डरची अपहरणानंतर हत्या, मृतदेह विहिरीत, शिरुरवासियांचा कँडल मार्च