Mira Road Murder : वेब सीरिज पाहून तिला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगलवर सर्चिंग

मुंबईतील सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील पोलीस तपासात खळबळजनक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सानेने वेब सिरीज पाहून सरस्वतीला मारण्याचा कट रचला होता.

Mira Road Murder : वेब सीरिज पाहून तिला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुगलवर सर्चिंग
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 3:52 PM

मुंबई : मीरा रोड येथील सरस्व ती वैद्य हत्या प्रकरणात (Mira Road Murder Case) रोज नवनवे खुलासे होत असतात. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. आपण आणि सरस्वती दोघेही अनाथ असल्याचे आरोपी मनोज साने सांगत असतानाच शुक्रवारी त्यांचे नातेवाईक पुढे आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा थंड मनाचा असून त्याने अत्यंत विचारपूर्वक ही हत्या केली आहे.

मृत महिला सरस्वतीला आणखी चार बहिणी आहेत. आई लहानपणीच गेली. तर वडील सोडून गेले होते. म्हणून त्या अनाथाश्रमात वाढल्या. मनोज सानेचे नातेवाईक बोरीवली येथे राहतात व तेथील एक पॉश एरीयातील बिल्डिंगमध्ये मनोज सानेचा फ्लॅटही असल्याचे समोर आले आहे. मनोजने हा फ्लॅट 30 हजार रुपये मासिक भाड्यावर दिला. विशेष म्हणजे 10 वर्षांपूर्वी मनोज आणि सरस्वती यांची भेट झाली तेव्हा ते दोन वर्ष याच फ्लॅटमध्ये राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीं मनोजने ओटीटीवरील वेबसीरिज पाहिल्यानंतर सरस्वतीच्या हत्येचा कट रचला होता. हत्येनंतर मृतदेहाची वासलात कशी लावायची याबाबत त्याने गूगलवर सर्चही केले होते. मृतदेहाचे तुकडे करण्यापूर्वी मनोजने मृतदेहाचा फोटोही काढला होता. मोबाईल आणि फोटो पोलिसांच्या ताब्यात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीच्या मृतदेहावर प्राणघातक हल्ल्याच्या अनेक खुणा आहेत. या प्रकरणाची उकल करण्यासाठी मोबाईल हा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे, असे पोलिस म्हणाले. मोबाईलमध्ये काढलेली छायाचित्रे आणि सरस्वतीच्या मृतदेहावरील हल्ल्याच्या खुणा यावरून मनोजचा हेतू स्पष्ट होतो. याशिवाय गुगल सर्च इंजिनचा इतिहास अनेक महत्त्वाची गुपिते उघड करेल.

डीएनए टेस्टसाठी पाठवले मृतदेहाचे तुकडे

पोलिसांनी मृतदेहाचे अवयव डीएनए चाचणीसाठी जेजे रुग्णालयात पाठवले आहेत. सरस्वतीच्या 3 बहिणींनी शनिवारी मीरा रोड पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवर चालू असलेल्या बातम्यांवरून त्यांना सरस्वतीच्या हत्येची माहिती मिळाली. सरस्वती ही २०१४ साली कामाच्या शोधार्थ मुंबईत आली होती. याचदरम्यान तिची मनोजशी ओळख झाली. त्यावेळी मनोजने तिला बोरिवलीतील त्याच्या २ बीएचके फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जागा दिली होती. काही काळानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एका मंदिरात लग्न केले.

आठवणीसाठी मोबाईलमध्ये काढला फोटो

सरस्वतीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मृतदेहाचे फोटो काढल्याचे आरोपी मनोजचे म्हणणे आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे मनोज आणि सरस्वतीने मामा-भाचीचे नाते असल्याचे अनेकांना सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांच्या लग्नानंतर सरस्वतीच्या बहिणी तिच्या घरी जेवायला आल्या होत्या. सरस्वतीच्या बहिणींनी अंत्यसंस्कारासाठी मृतदेहाचे तुकडे मागितले आहेत.

HIV असल्याचा केला दावा

शुक्रवारी मनोजने त्याला एचआयव्ही आजार असल्याचा दावा केला होता. तो म्हणतो की त्याच्यावर उपचार सुरू होते आणि सरस्वतीसोबत कधीच शारीरिक संबंध नव्हते. पोलिस त्याने केलेल्या सर्व दाव्यांचा तपास करत आहेत. 29 मे पासून आरोपी कामावर जात नव्हता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.