Solapur Crime | फक्त मोबाईल चोरीसाठी नागपूर-सोलापूर प्रवास, परराज्यातील टोळीचा पर्दाफाश, 11 जणांना बेड्या

Solapur Crime | फक्त मोबाईल चोरीसाठी नागपूर-सोलापूर प्रवास, परराज्यातील टोळीचा पर्दाफाश, 11 जणांना बेड्या
सांकेतिक फोटो

सोलापूर शहरात अशाच एका मोबाईल चोरी करणाऱ्या टोळाची पर्दाफाश करण्यात आलाय. ही टोळी फक्त मोबाईल (Mobile) चोरण्यासाठी नागपूरहून सोलापूरपर्यंत प्रवास करायचे. ही टोळी मूळची झारखंडमधील आहे. पोलिसांनी (Police) टोळीतील एकूण अकरा जणांना ताब्यात घेतले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 29, 2022 | 12:26 PM

सोलापूर : राज्यात चोरी (Robbery), दरोडा तसेच लुटीचे अनेक प्रकार रोजच समोर येतात. काही ठिकाणी तर अतिशय धाडसी आणि मोठ्या चोऱ्या केल्या जातात. सोलापूर शहरात अशाच एका मोबाईल चोरी करणाऱ्या टोळाची पर्दाफाश करण्यात आलाय. ही टोळी फक्त मोबाईल (Mobile) चोरण्यासाठी नागपूरहून सोलापूरपर्यंत प्रवास करायचे. ही टोळी मूळची झारखंडमधील आहे. पोलिसांनी (Police) टोळीतील एकूण अकरा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सहा लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अटक केलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन अल्पवयीन आरोपी आहेत.

6 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरात मोबाईल चोरी करणाऱ्या एका टोळीमधील तब्बल 11 जणांना पोलिसांनी अटक केलंय. ही टोळी झारखंडमधील असून या चोरट्यांसह मोटारसायकल, मालवाहू ट्रक तसेच मोबाईल आणि सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या आकरा चोरट्यांकडून 6 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तशी माहिती पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरी यांनी दिलीय. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. मोबाईल चोरीसाठी ही टोळी झारखंडहून आलेली होती. चोरटे नागपूरपासून सोलापूरपर्यंत केवळ मोबाईल चोरी करण्यासाठी जात. लहान मुलांच्या माध्यमातून ही मोबाईल चोरी करुन घेतली जात होती.

पोलिसांनी काय काय जप्त केलं ?

दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून मोठा मुद्देमाल जप्त केलाय. यामध्ये आरोपींकडून 4 मोबाईल, 3 मोटारसायकली, मालवाहू ट्रक, एक तोळे सोन्याची अंगठी, सोन्याच्या रिंग्स आणि सात हजार रुपये हस्तगत करण्यात आले. सोलपूरच्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्याने ही दमदार कारवाई केलीय.

इतर बातम्या :

Satara Crime | ‘सेमी इंग्लिश मिडियम नको’ म्हणत साताऱ्यात विद्यार्थिनीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये नेमकं काय ?

इम्तियाजचे सत्तूरने समिनावर सपासप वार! वाचवायचं दूरच, निर्दयी घटनेचा मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला गेला थरार

Mumbai Crime | 17 किलो सोनं 8 कोटी किंमत, मुंबईतून चोरून राजस्थानात पुरलं, पोलिसांनी पर्दाफाश कसा केला ?


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें