Pimpri Chinchwad Crime | अखेर छडा लागला, 61 लाखांच्या मोबाईल चोरीमागे बंगाली टोळी; तिघांना बेड्या, 3 जण फरार

चार जानेवारी रोजी शोरूम फोडून लाखोंचे मोबाईल पळवण्यात (Robbery) आले होते.  याच चोरीचा पोलिसांनी छडा लावला आहे. मोबाईल पळवणाऱ्या बंगाली टोळीला पोलिसांनी अटक केलं आहे. पोलीस त्यांची सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केलं असून तिघे फरार आहेत. 

Pimpri Chinchwad Crime | अखेर छडा लागला, 61 लाखांच्या मोबाईल चोरीमागे बंगाली टोळी; तिघांना बेड्या, 3 जण फरार
ROBBERY AND MOBILE
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 9:40 AM

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या भागात गुन्हेगारी घटनांत मोठी वाढ झाली आहे. पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथे स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) नुकताच भंडाफोड केला आहे. येथे खून, चोरीच्या घटनांमध्येही लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी भागतील मोबाईलचे शोरुम फोडल्याची धक्कादायक घटाना घडली होती. येथे चार जानेवारी रोजी शोरूम फोडून लाखोंचे मोबाईल पळवण्यात (Robbery) आले होते. आता याच चोरीचा पोलिसांनी छडा लावलाय. मोबाईल पळवणाऱ्या बंगाली टोळीला पोलिसांनी अटक केलं आहे. पोलीस त्यांची सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केलं असून तिघे फरार आहेत.

तब्बल 61 लाखांची चोरी झाल्यामुळे खळबळ 

मिळालेल्या माहितीनुसार भोसरी येथील एम आर सूर्य इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि समर्थ मोबाईलचे शोरूम फोडून चोरट्यांनी 61 लाख रुपये किमतीचे 244 मोबाईल फोन चोरुन नेले होते. चोरीची ही घटना 4 जानेवारी रोजी उघडकीस आली होती. या बड्या चोरीमुळे पिंपरी चिंचवड भागात एकच खळबळ उडाली होती. तसेच तब्बल 61 लाखांची चोरी झाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीती निर्माण झाली होती.

आरोपींना पश्चिम बंगालमधून बेड्या 

यातील आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. दरम्यान, ही घरफोडी पश्चिम बंगाल येथील आरोपींनी केली असल्याचा शोध अखेर पोलिसांनी लावला आहे. पश्चिम बंगाल येथील तीन जणांना भोसरी पोलिसांनी अटक केलंय. जानीबुलहक मामुलत अली, जब्बार कुतुब अली, जहांगीरअलम मामुदी शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आलम मोंटू शेख, नूरइस्लाम उर्फ जंजाली मामुलत अली, अल्लाउद्दीन मामुलत अली हे तिघेजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वाकडमध्ये स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय 

दरम्यान, पिंपरी चिंचवडमधील गुन्हारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच भागातील वाकड येथे स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली असून या वेश्या व्यवसायावर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. येथून एकूण सात महिलांची सुटका करण्यात आली असून शुभांकर महेश जवाजीवार तसेच रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

इतर बातम्या :

Video | जळगावमध्ये तलवारीने केक कापला, आणि बर्थडे बॉयची पोलीस स्टेशनमध्ये रवानगी

Murder | मुळशी पॅटर्न पाहून आपल्याच मित्राला भोसकलं, बारावीत शिकणाऱ्या रोहनच्या हत्येचं गूढ उकललं

Pune Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, 7 महिलांची सुटका, 2 आरोपींना बेड्या

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.