Pune Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, 7 महिलांची सुटका, 2 आरोपींना बेड्या

Pune Crime | स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, 7 महिलांची सुटका, 2 आरोपींना बेड्या
सांकेतिक फोटो

पिंपरी चिंचवडमधील वाकड भागातील स्पा सेंटरमध्ये चक्क वेश्या (Prostitution) व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. हा धक्कादाय प्रकार समोर आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली असून या वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.

रणजीत जाधव

| Edited By: prajwal dhage

Jan 26, 2022 | 8:35 AM

पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात (Pune Crime) गुन्हेगारी वाढली आहे. खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. आता तर पिंपरी चिंचवडमधील वाकड भागातील स्पा सेंटरमध्ये चक्क वेश्या (Prostitution) व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली असून या वेश्या व्यवसायावर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. येथून एकूण सात महिलांची सुटका करण्यात आली असून शुभांकर महेश जवाजीवार तसेच रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे यांना पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. पोलीस अटक केलेल्या आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.

स्पा सेंटरमध्ये सुरु होता व्येश्या व्यवसाय 

मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमधील वाकड भागातील स्पा सेंटरमध्ये चक्क वेश्या व्यवसाय सुरु होता. याची माहिती पिंपरी चिंचवडमधील सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर डांगे चौकातील ईलिमेंट्स द फॅमिली स्पा या स्पा सेंटरवर पिंपरी चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. यामध्ये सात महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

दोन आरोपींना अटक, सात महिलांची सूुटका

तर शुभांकर महेश जवाजीवार, रत्नप्रभा मोतीलाल बत्तीसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोन आरोपींनी सात महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. पोलिसांनी सात महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली असून त्यांना त्यांच्या घरी तसेच वेगवेगळ्या समाजिक संस्थांकडे सोपवले जाणार आहे.

यापूर्वी पाच महिलांची केली होती सुटका

दरम्यान, डिसेंबर महिन्यात पोलिसांनी अशाच प्रकारची कारवाई केली होती. पिंपरी चिंचवडमध्येच स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले होते. यावेळी एकूण पाच महिलांची सुटका करण्यात आली होती. यापूर्वी आरोपी सचिन भिसे पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वैश्याव्यवसाय करायला भाग पडत असे. वाकड येथील ब्लॉझम सलून येथे हा व्यवसाय चालवला जायचा. सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही करवाई करण्यात आली होती. पोलीस कर्मचारी सोनाली माने यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

इतर बातम्या :

Pimpri Chinchwad crime| पिंपरी – चिंचवडमध्ये रुजू पाहणाऱ्या वेश्या व्यवसायाची पाळंमुळं सातासमुद्रा पल्याडची

Crime | प्रेमानेच केला घात ! 18 वर्षीय तरुणीचा बॉयफ्रेंडकडून खून, पोलिसांनी कसं पकडलं ?

Murder | सासूच्या जीवावर उठली सून, निवृत्त जेलरचं रिव्हॉल्वर चोरून सुनेनं केला खून


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें