Crime | प्रेमानेच केला घात ! 18 वर्षीय तरुणीचा बॉयफ्रेंडकडून खून, पोलिसांनी कसं पकडलं ?

Crime | प्रेमानेच केला घात ! 18 वर्षीय तरुणीचा बॉयफ्रेंडकडून खून, पोलिसांनी कसं पकडलं ?
पिस्तुलचा धाक दाखवून लोकांना नग्न करुन अनैसर्गिक कृत्यास भाग पाडणाऱ्या विकृत टोळीचा पर्दाफाश

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (Prayagraj Crime) येथे प्रेम या पवित्र संकल्पनेला काळं फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका प्रियकराने आपल्याच प्रेमिकेला जिवे मारले (Murder) असून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 26, 2022 | 7:52 AM

लखनौ : आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी प्रेमी युगुल कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात. घरच्यांचा विरोध, समाजाची भीती अशा गोष्टींना फाट्यावर मारत प्रेमी एकमेकांसाठी जगण्याच्या आणभाका घेताना तुम्ही पाहिले असेल. पण उत्तर प्रदेशमधील प्रयागराज (Prayagraj Crime) येथे प्रेम या पवित्र संकल्पनेला काळं फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका प्रियकराने आपल्याच प्रेमिकेला जिवे मारले (Murder) असून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) आरोपीला अटक केलं असून त्याने आपला गुन्हा गबूल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

आरोपी अमनसिंहशी होती चांगली मैत्री

मिळालेल्या माहितीनुसार प्रयागराजमधील फुलपूर येथील 18 वर्षीय विद्यार्थिनी सलोरी येथे एका वसतीगृहात राहत होती. तसेच ईश्वर शरण या कॉलेजमधून ती बीएचे शिक्षण घेत होती. याच कॉलेजमध्ये आझमगड येथील अमनसिंह नावाचा विद्यार्थीदेखील शिकत होता. अमनसिंह मृत विद्यार्थिनी राहत असलेल्या सलोरी याच भागात राहायचा. या दोघांचीही चांगली मैत्री होती. मात्र मागील दोन दिवसांपासून मृत विद्यार्थिनी गायब असल्यामुळे तिचे कुटुंबीय घाबरले होते. शोध घेऊनही ती न मिळाल्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली होती.

आरोपीने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला

कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेणे सुरु केले होते. मात्र मुलगी सापडत नसल्यामुळे तिच्या कुटुंबीयांचे रडून रडून हाल झाले होते. दरम्यान, पोलिसांना तिचा मित्र असलेला अमनसिंहवर शंशय आला. पोलिसांनी अमनकडे गायब असलेल्या विद्यार्थिनीबद्दल विचारले. मात्र चौकशीत त्याने संदिग्ध अशी उत्तरं दिली. आरोपी अमनने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याची चलाखी पोलिसांसमोर चालू शकली नाही. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

म्हणाला मीच प्रेत विहिरीत फेकलं

दरम्यान, पोलिसांनी आरोपी तथा मृत मुलीचा प्रियकर अमनसिंह याला अटक केलं आहे. पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत. आपणच गायब असलेल्या मुलीला संपवलं असल्याचं आरोपीने प्राथमिक चौकशीत मान्य केलं आहे. मीच तिला मारलं असून तिचे प्रेत विहिरीत फेकून दिल्याचं अमनस सिंह याने पोलिसांना सांगितले आहे. तर आरोपीने दिलेल्या माहितीनुसार विहिरीत शोध घेतला असता विद्यार्थिनीचे प्रेत सापडले असून शवविच्छेदन करण्यात आले आहे. आरोपी अमनसिंहवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत विद्यार्थिनीचे कुटुंबीय करत आहेत.

इतर बातम्या :

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात दुकानं फोडत व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

Noida : आधी पत्नीचा गळा आवळला, मग आत्महत्या दर्शवण्यासाठी पंख्याला लटकवले, नोएडात दारुच्या नशेत पतीकडून महिलेची हत्या

डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें