डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?

माफियांकडून रात्रीच्या वेळी हे उत्खनन होते. गावातील काही जणांचाही यात अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यानंतर हे दगड औरंगाबादमार्गे इतर राज्यांसह चीनपर्यंतही विकले जातात. तसेच काही व्यापारीही जिल्ह्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

डोंगर पोखरून गारगोटीची तस्करी, थेट चीनपर्यंत विक्री, जालन्यातल्या हिरवट निळ्या दगडांचं महत्त्व आहे तरी काय?
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 7:00 AM

जालनाः दोन दिवसांपूर्वीच जालना पोलीस आणि महसूल पथकानं केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांची गारगोटी (Pebbles Smuggling) जप्त केली. त्यामुळे जालन्यातल्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर गारगोटीची तस्करी सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. येथील काहही भागांमध्ये किंवा डोंगराच्या कुशीत तीस-चाळीस फूट खोदलं की आकर्षक गारगोटी लागतात. दगडाच्या दर्जानुसार, या गारगोटींची किंमत कोट्यवधींच्या घरात जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या दगडांची चोरी या परिसरात मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याची विक्री परराज्यात तसेच थेट चीनपर्यंतही होते, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघड झाली आहे.

लाखोंचा भाव, कशासाठी वापर?

जालना परिसरातील काही भागांमध्ये विशेषतः डोंगरी भागात तीस ते चाळीस फूट खोदल्यावर असा दगड सापडतो. हिरवट, काळपट रंगाचा हा दगड अत्यंत मोलाचा आहे. दगडातील मिळणाऱ्या गारगोटीतून घराच्या भिंती, किंवा सजावटीसाठी खूप मागणी असते. महसूल विभागाकडून या दगडाच्या उत्खननाची परवानगी नाही. परंतु काही जण पोलीस, महसूल विभागाची नजर चुकवून याचे उत्खनन करीत असतात. दगडाच्या दर्जानुसार त्याला 40 हजारांपासून 1 लाख रुपये टनांपर्यंतचा भाव मिळतो. शेतातली पिकं निघाली की जिल्ह्यातील विविध भागांतील डोंगरांतून गारगोटीचे उत्खनन सुरु होते. गारगोटीची तस्करी करून तिची विक्री औरंगाबादमार्गे पार चीनपर्यंत केली जाते, असे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.

याआधीही माफियांवर कारवाई

जालना ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआदीही 2013 मध्ये अंबड तालुक्यातील काही गावांच्या शिवारातून पोलीस आणि महसूलच्या पथकाने तब्बल 3 कोटी रुपयांची गारगोटी जप्त केली होती. यानंतर 2018 मध्येही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माळशेंद्रा परिसरातून तब्बल 40 लाख रुपयांचा दगड जप्त केला होता. या मोठ्या कारवायांव्यतिरिक्त मुख्य तस्करी करणाऱ्यांपर्यंत पोलीस अजूनही पोहोचलेले नाहीत.

कसा होतो व्यवहार?

जिल्ह्यातील माळशेंद्रा, वाघ्रुळ, मान देऊळगाव दगडवाडी यासह अंबड तालुक्यातील नांदी आदी परिसरात या कारवाया झाल्या आहेत. डोंगराच्या उत्खननासाठी जेसीबी ते तस्करी करण्यासाठी इतर वाहनांचा उपयोग होतो. माफियांकडून रात्रीच्या वेळी हे उत्खनन होते. गावातील काही जणांचाही यात अप्रत्यक्ष सहभाग असतो. त्यानंतर हे दगड औरंगाबादमार्गे इतर राज्यांसह चीनपर्यंतही विकले जातात. तसेच काही व्यापारीही जिल्ह्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. आता पोलीस त्यांचा तपास घेत आहेत.

इतर बातम्या-

Neeraj Chopra : ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राला मिळणार विषेश सेवा मेडल, 384 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

मुंबई महापालिकेत शिवसेनेला चारी मुंड्या चीत करु, भाजपचा संकल्प; फडणवीसांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर
'त्यांनी गप्पा हाणाव्यात का?' राज ठाकरेंच्या त्या टीकेवर दादांच उत्तर.
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप
'सगळ्या गोष्टी बाहेर काढेन', मुंडेंना इशारा देत सदावर्तेंवर गंभीर आरोप.
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा
27 वर्षानंतर दिल्लीत कमळ अन् मोदी ॲक्शन मोडमध्ये, केजरीवालांना इशारा.
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
'ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे... फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा.
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव
Delhi Election Result : दिल्लीतील पराभवानंतर काय म्हणाले अरविंद केजरीव.
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल
EVM वर बोलणारी तीन माकडं आज गायब - नितेश राणेंचा हल्लाबोल.
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार
संजय राऊत म्हणजे बडबड बहाद्दर - गिरीश महाजनांनी घेतला समाचार.
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा
अहंकार रावण का भी नहीं बचा था - स्वाती मालीवाल यांचा ट्विटमधून निशाणा.
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत
Delhi Election Result : आपसाठी मोठा धक्का, अरविंद केजरीवाल पराभूत.
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?
आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अण्णा हजारे काय म्हणाले ?.