Ulhasnagar Crime : उल्हासनगरात दुकानं फोडत व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

नेहरू चौक परिसरात जपानी मार्केट नावाचा परिसर आहे. या मार्केटमध्ये शनिवारी 22 जानेवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच चोरट्यांनी घुसून सलग पाच ते सहा दुकानं फोडली आणि चोऱ्या केल्या. यानंतर आणखी एक दुकान फोडण्याच्या प्रयत्नात असताना दुकानाबाहेर झोपलेल्या चंदर आहुजा या व्यापाऱ्याने त्यांना प्रतिकार केला.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात दुकानं फोडत व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
बदलापूरमध्ये ज्वेलर्स व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरी
Follow us
| Updated on: Jan 25, 2022 | 10:12 PM

उल्हासनगर : चोरट्यांनी पाच ते सहा दुकानं फोडत प्रतिकार करणाऱ्या एका व्यापाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. चंदर आहुजा(Chandar Ahuja) असे मारहाण करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जखमी व्यापाऱ्याला उल्हासनगरमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून मुंबईच्या सायन रुग्णालयात(Sion Hospital) हलविण्यात आले. चंदर हे अद्याप शुद्धीवर आले नसून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सचिन आंबोरे, मदन तुपे, अमन गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. व्यापाऱ्याला मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Attempt to kill a trader by stealing from a shop in Ulhasnagar)

व्यापाऱ्याने प्रतिकार केल्याने चोरट्यांकडून बेदम मारहाण

उल्हासनगरच्या कॅम्प 2 भागातील नेहरू चौक परिसरात ही चोरी आणि व्यापाऱ्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नाची घटना घडली आहे. नेहरू चौक परिसरात जपानी मार्केट नावाचा परिसर आहे. या मार्केटमध्ये शनिवारी 22 जानेवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाच चोरट्यांनी घुसून सलग पाच ते सहा दुकानं फोडली आणि चोऱ्या केल्या. यानंतर आणखी एक दुकान फोडण्याच्या प्रयत्नात असताना दुकानाबाहेर झोपलेल्या चंदर आहुजा या व्यापाऱ्याने त्यांना प्रतिकार केला. त्यामुळं या सर्वांनी मिळून चंदर यांना लाथा-बुक्क्या आणि कमरेच्या पट्ट्याने जीवघेणी मारहाण केली. यानंतर त्यांना तिथेच टाकून हे सगळे पसार झाले. सकाळी चंदर यांचा मुलगा दुकान उघडण्यासाठी आला असता त्याला वडील बेशुद्धावस्थेत दुकानाबाहेर पडलेले दिसले. त्यामुळं त्यांना तातडीनं उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथून मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून अजूनही ते शुद्धीवर आलेले नाहीत.

सीसीटीव्हीच्या सहाय्याने तिघांना अटक

दरम्यान, या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी या मार्केट परिसरातले सीसीटीव्ही तपासले असता त्यात पाच तरुण हे चंदर यांना मारताना आणि तिथून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले. त्यानुसार तपास करत पोलिसांनी सचिन आंबोरे, मदन तुपे आणि अमन गुप्ता या तिघांना अटक केली. या तिघांनीही चोरी आणि हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मात्र संतापाचं वातावरण आहे. (Attempt to kill a trader by stealing from a shop in Ulhasnagar)

इतर बातम्या

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा 6 हजारांहून अधिक एनजीओंना दणका; परवाना नूतनीकरणास स्पष्ट नकार

Pimpri Chinchwad crime| ‘शहारात कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याचे मला मान्य’ – आयुक्त कृष्णप्रकाश यांचा खुलासा

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.