Murder | लातुरात मुळशी पॅटर्नचा थरार, रोहितच्या हत्येचं गूढ उकललं

Murder | लातुरात मुळशी पॅटर्नचा थरार, रोहितच्या हत्येचं गूढ उकललं
मुळशी पॅटर्न सिनेमा पाहून करण्यात आली रोहनची हत्या!

Latur Student Murder case : मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तैनात केली होती. यानंतर पोलिसांना मारेकऱ्यांबाबत माहिती मिळाली. पुण्यातून लातूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मारेकरी असल्याचं पोलिसांनी समजलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 26, 2022 | 10:29 AM

लातूर : लातुरात रविवारी घडलेल्या धक्कादायक हत्याप्रकरणाचा (Latur 12th Student Murder Case) अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी या हत्याप्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून त्यानं हत्येची कबुलीही केली आहे. प्रसिद्धीच्या भावनेनं त्याचं चक्क मुळशी पॅटर्न सिनेमा (Mulashi Pattern Marathi Movie) आणि मालिका पाहून हत्या केली असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. हत्या करण्यात आलेल्या रोहन उजळंबेशी त्याच्या मित्राचं भांडण झालं होतं. या भांडणाचा राग मनात ठेवूनच त्यानं धारदार शस्त्रानं रोहनवर जीवघेणा हल्ला केला. विशाल नगरमधील साई मंदिर चौकात सोबत आणलेल्या धारदार कोयत्यानं मारेकरी मित्र्यानं रोहनवर फिल्मिस्टाईन पद्धतीनं सपासप वार केले. यानंतर गंभीररीत्या जखमी झालेल्या रोहनला शासकीय रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण अखेर तिथं त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. रोहनच्या भरदिवसा करण्यात आलेल्या हत्येमुळे लातुरात (Latur City) एकच खळबळ उडाली होती. अखेर आता पोलिसांनी मोठ्या शिताफीनं मारेकऱ्यांना पकडलं असून मारेकऱ्यांनी पोलिसांना दिलेला जबाबही हारवणारा आहे. अपल पोलिस अधीक्षक अनुराज जैन यांनी आरोपीनं दिलेल्या कबुलीबाबत माहिती दिली आहे.

भांडणातून खुन्नस…

रोहन उजळंबे हा बारावीमध्ये शिकणारा विद्यार्थी होता. बारावी कॉमर्सला शिकणाऱ्या रोहनचे आपल्याच मित्रांसोबत भांडण झालं होतं. काही दिवसांपूर्वी झालेल्या या भांडणातून रोहननं नंतर वाद मिटवलाही होता. आपण दोन मित्र आहोत, असा विश्वास रोहनला मित्राने दिला होता. मित्राच्या बोलण्यावर रोहननंही सुरुवातील विश्वास ठेवला. पण मित्राच्या मनात भलताच राग दाटून होता. भांडणाची खुन्नस काढण्याच्या हेतून त्यांनं रोहनचा काटा काढण्यासाठी त्याचा खून करण्याचा विचार मारेकरी मित्राच्या मनात घोळत होते. अखेर रोहनची रविवारी सकाळच्या सुमारास भरदिवसा लातूर शहरात धारदार शस्ज्ञानं हत्या करण्यात आली होती.

मारेकऱ्यांना कसं पकडलं?

रविवारी झालेल्या या हत्याकांडानंतर पोलिस मारेकऱ्यांच्या मागावर होते. पण मारेकरी हे हत्या केल्यानंतर सोलापूर, पुणे आणि इतर ठिकाणी भटकत होते. पोलिसांना गुंगारा देत मारेकऱ्यांनी आपण ठिकाण वारंवार बदलत ठेवत पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं मारेकऱ्यांना एका ट्रॅव्हल्समध्ये गाठलच.

मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथकं तैनात केली होती. यानंतर पोलिसांना मारेकऱ्यांबाबत माहिती मिळाली. पुण्यातून लातूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मारेकरी असल्याचं पोलिसांनी समजलं. या माहितीच्या आधारं पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली आहे. यानंतर आरोपींनी मुळशी पॅटर्न सिनेमा पाहून आणि मालिका पाहून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपण हत्या केली, अशी कबुलीदी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, 7 महिलांची सुटका, 2 आरोपींना बेड्या

सासूच्या जीवावर उठली सून, निवृत्त जेलरचं रिव्हॉल्वर चोरून सुनेनं केला खून

प्रेमानेच केला घात ! 18 वर्षीय तरुणीचा बॉयफ्रेंडकडून खून, पोलिसांनी कसं पकडलं ?


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें