लग्नाच्या दिवशी जावयाचं ‘ते’ गुपित उघड, नवरी किंचाळली; सासू तर कोसळलीच ..
लग्नासाठी सगळी तयारी झाली, मंडपही सजला होता. मात्र त्याच दिवशी वराने असे कृत्य केले ज्यामुळे वधू आणि तिच्या आईची तब्येत अचानक बिघडली. दोघींनाही रुग्णालयात दाखल करावे लागले. नेमकं झालं तरी काय ?

आई, कामासाठी जरा बाहेर जाऊन येतो, लवकरच येईन… एवढंच बोलून होणारा नवरा मुलगा घराबाहेर पडला आणि दिसेनासा झाला. घरातले लोक तर त्याची वाट बघत होते, पण तो काही परत आला नाही. लग्नाची सगळी तयारी झाली, तिथे होणारी वधू आणि तिच्या घरचेही लग्नासाठी तयार होते, मंडपही सजला होता. पण नवऱ्या मुलाचा काही पत्ताच लागेना, तेवढ्यात एक बातमी समोर आली आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्न तोंडावर आलेलं असतानाच होणारा नवरा मुलगा हा त्याच्या गर्लफ्रेंडसह पळून गेल्याचे समजलं आणि सगळेच हादरले.
हे ऐकून वराच्या आईने होणाऱ्या सुनेच्या आईला घरी बोलावलं आणि तिला सगळी घटना सांगितलं. मात्र ते ऐकताच वधूच्या आईची तब्येत बिघडली . आणि भावी वधूही बेशुद्धच झाली. ते पाहून सगळेच चिंतीत झाले. त्यांना कसंबसं उपचारांसाठी तातडीने रुग्णायलयात दाखल करण्यात आलं. लग्नातील या गोंधळाचीच सध्या गावात चर्चा सुरू आहे.
वधू सजून तय्यार आणि तेवढ्यात फोन वाजला..
हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथील आहे. 23 फेब्रुवारीला महाराजगंज येथील नौतनवा येथील एका घरात लग्नसोहळा होणार होता. लग्नाच्या मिरवणुकीच्या स्वागतासाठी वधूपक्षाने जय्यत तयारी केली होती. वधूही सजून तयार झाली होती. फक्त लग्नाची वरात येण्याची वाट बघत होती. तेवढ्यात घरातला फोन वाजला. वधूच्या आईने फोन उचलला. वराची आई समोरून बोलती होती. ती म्हणाली- हॅलो! आम्ही लग्नाची वरात घेऊन येऊ शकत नाही. माझा मुलगा त्याच्या मैत्रिणीसोबत पळून गेला आहे. आम्ही देखील त्याचा शोध घेत आहोत. काय करावं समजत नाही, असं त्याच्या आईने होणाऱ्या विहीणबाईंना सांगितलं.
हे ऐकून वधूच्या आईने फोन कट केला आणि ती बेशुद्ध पडली. घरच्यांनी तिच्याकडे धाव घेतली आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. कोणाचा फोन होता? काय झालं? असे प्रश्न सगळेजण विचारू लागले. मात्र वधूच्या आईच्या तोंडून कसेबसे शब्द निघाले. लग्नाची वरात येत नाही. नवरा मुलगा गर्लफ्रेंडसह पळून गेला. आईच्या तोंडचे ते शब्द ऐकून भावी वधू हादरलीच,तिच्या पायाखालची वाळूच सरकली. जोरात किंकाळी फोडून नवरी मुलगीसुद्धा जमीनीवर कोसलळी अन् बेशुद्ध झाली.
आई-लेक रुग्णालयात दाखल
ते पाहून कुटुंबियही हादरले. त्यांवी त्या दोघींनाही तत्काळ जवळच्या खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. काही वेळाने दोघांच्याही प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. दुसरीकडे, वधूच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन वराच्या विरोधात तक्रार दाखल केली. वधूचे वडील म्हणाले – या लग्नात आमचा बराच खर्च झाला. सगळे नातेवाईकही आलेत. आमची अशी अवस्था करणात्या त्या नवऱ्या मुलाविरोधात कठोर कारवाई करावी आणि लग्नाचा सगळा खर्च आम्हाला परत मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
वराची आई काय म्हणाली ?
मात्र एवढं सगळं होऊनही तो नवरा मुलगा कुठे आहे ते समजू शकलेलं नाहीये. वराकडचे सगळेच त्याच्यामुळे त्रस्त आहेत, सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे. वराच्या आईने सांगितले – लग्नाच्या दिवशी काम असल्याचे मुलगा सांगून निघून गेला होता. आम्ही त्याच्या परत येण्याची वाट पाहत होतो. पण तो घरी आलाच नाही. पण थोड्या वेळाने आम्हाला समजलं की तो तर त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचे आता पुढे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
