मुलगा आईसोबत इतका निघृणपणे कसा वागू शकतो? सांगलीतल्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ

नराधमांना आपल्या आईची किंमत नसते. ते स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्या आईच्या जीवाची पर्वा करत नाहीत. तशीच काहीशी घटना सांगलीतून समोर आलीय.

मुलगा आईसोबत इतका निघृणपणे कसा वागू शकतो? सांगलीतल्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ
संपत्तीसाठी पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 9:56 PM

सांगली : आईचे लेकरावर किती उपकार असतात हे एक मुलगा किंवा मुलीशिवाय कोण ओळखू शकणार नाही.  आई आपल्या लेकरांसाठी स्वत:चा विचार करत नाही. ती आपल्या मुलांसाठी एकवेळ स्वत:च्या जीवाची बाजी लावते. ती आपल्या मुलांना काय हवं नको ते पुरवते. आपल्या मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती आपल्या बाळासाठी नऊ महिने यातना सोसते. आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच मांडता येणार नाही असं असतं. पण काही नराधमांना आपल्या आईची किंमत नसते. ते स्वत:च्या स्वार्थासाठी आपल्या आईच्या जीवाची पर्वा करत नाहीत. सांगली जिल्ह्यातून देखील अशीच काहीशी घटना समोर आलीय. एका नराधमाने आपल्या सख्ख्या आईची दगडाने ठेचून हत्या केलीय.

अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक ही घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात घडली आहे. माडग्याळ-व्हसपेठ हद्दीच्या जवळ शेतातील घरात मुलाने आईचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे.

जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर खून करणारा नराधम हा सुरेश आण्णाप्पा कोरे हा शांताबाई यांचा एकुलता एक मुलगा आहे.

हे सुद्धा वाचा

शांताबाई कोरे यांचा सुरेश हा एकुलता एक मुलगा आहे. शांताबाईंच्या पतीचे पूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे आई आणि मुलगा दोघेच शेतातील घरामध्ये राहत होते.

या दरम्यान रविवारी दुपारी शेतामध्ये आई आणि मुलगा यांच्यात वादावादी झाली. या वादातून सुरेशने आईच्या डोक्यात दगड घालून आणि दगडाने ठेचून खून केला.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.