सलूनमध्ये गेले ते परतलेच नाही, मध्यरात्री थेट मृतदेहच… सीसीटीव्हीत काय दिसलं?
मुंबईत गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या असून मीरा-भाई्ंदरजवळ अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सलूनमध्ये गेलेले एक वयोवृद्ध नागरिक परतलेच नाहीत, मात्र मध्यरात्री त्याच सलूनचा मालक जड काही ओढत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाला आणि मोठा गुन्ह उघडकीस आला.

मुंबईत गुन्ह्यांच्या घटना वाढतच चालल्या असून मीरा-भाई्ंदरजवळ अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. सलूनमध्ये गेलेले एक वयोवृद्ध नागरिक परतलेच नाहीत, मात्र मध्यरात्री त्याच सलूनचा मालक जड काही ओढत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाला आणि मोठा गुन्ह उघडकीस आला. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाच्या शोधासाठी कुटुंबियांनी काशिमिरा पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट दाखल केली. मात्र पोलिसांनी शोध घेतला असता धक्कादायक सत्य समोर आले. एका सोन्याच्या चेनसाठी सलून मालकानेच ग्राहकाची हत्या केल्याचे उघड झाले, यामुळे मोठी खळबळ माजली आहे,
विठ्ठल तांबे (वय 76 वर्ष) असं मृत नागरिकांच नाव असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून अटक केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पश्चिम उपनगरांत राहणारे विठ्ठल तांबे (वय 76) हे 16 सप्टेंबर रोजी घरातून बाहेर पडले होते. मात्र ते घरीच परत आले नाहीत. बराच वेळ होूनही ते आन आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध केली, पण त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही. अखेर तांबे यांच्या कुटुंबियांनी काशिमिरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगत मिसिंग कंप्लेंट दाखल केली.
त्याची दखल घेत काशिमिरा पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. तांबे हे बाहेर पडले तेव्हापासून त्या भागातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज शोधण्यासा सुरूवात केली. त्यावेळी विठ्ठल तांबे हे शेवटचे एका सलूनमध्ये जाताना दिसले. मात्र ते तिथून बाहरे आलेच नाहीत.
पोलिसांनी आणखी तपास केला असता भयानक सत्य उघड झाला. सीसीटीव्ही तपासात आढळले की, सलून चालकाने त्यांच्या गळ्यातील सोने काढून घेतले आणि त्यांची हत्या केली. आणि त्याच रात्री (16 सप्टेंबर) आरोपी सलून चालकाने तांबे यांचा मृतदेह सलूनमधून बाहेर ओढत नेला, त्याचा व्हिडीओही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला, त्यानंतर त्यान तो मृतदेह ड्रेनेजमध्ये टाकून दिला आणि तो फरार झाला. अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध लावत आरोपीला अटक केली असून आणखी तपास सुरू आहे.
