कापूर, अगरबत्ती लावून वडिलांचा मृतदेह 3 दिवस घरात, मग मुलीचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला, विरारमधील गूढ कसं उकललं?

विरारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने कोरोनाच्या भीतीने घरातील 72 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह 3 दिवस घरातच ठेवला. तर घरातीलच 40 वर्षीय मुलीने विरार नवबपूर समुद्रात जाऊन आत्महत्या केली.

कापूर, अगरबत्ती लावून वडिलांचा मृतदेह 3 दिवस घरात, मग मुलीचा मृतदेह समुद्रकिनारी सापडला, विरारमधील गूढ कसं उकललं?
आधी 72 वर्षीय वडिलांचा मृत्यू, मृतदेह तीन दिवस घरातच, एका मुलीची आत्महत्या, दुसरीला आत्महत्येपासून वाचवण्यात यश

पालघर : विरारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने कोरोनाच्या भीतीने घरातील 72 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह 3 दिवस घरातच ठेवला. तर घरातील 40 वर्षीय मुलीनेही विरार नवबपूर समुद्रात जाऊन आत्महत्या केली. त्यानंतर आज (4 ऑगस्ट) सकाळी तिच्या दुसऱ्या बहिणीने अर्नाळा समुद्रात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तेथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचविण्यात यश आले आहे. वाचलेल्या तरुणीच्या जबाबावरुन हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही सर्व घटना कोरोनाची भीती, आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक वादातून घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

नेमकं प्रकरण काय?

विरार पश्चिमेत ग्लोबल सिटी परिसरातील अग्रवाल ब्रूक्लीन पार्क या इमारतीत आई-वडील आणि दोन मुली असे 4 जणांचे कुटुंब वास्तव्यास होतं. यामध्ये मृतक हरिदास साहकार (वय 72), 65 वर्षांची आई, मोठी मुलगी विद्या हरिदास सहकार (वय 40), स्वप्नल हरिदास साहकार (वय 36) अशा चौघांचा समावेश होता. वडील हरिदास हे रेशनिग डिपार्टमेंटमधून निवृत्त झाले होते. निवृत्तीच्या पेन्शनवर सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. हे कुटुंब 8 दिवसांपूर्वीच विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटीमधील ब्रूक्लीन पार्क या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहण्यासाठी आले होते.

मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून डांबर गोळ्या, कापूर

या दरम्यान 1 ऑगस्टला वडील हरिदास यांचे राहत्या घरात अचानक निधन झाले. या निधनानंतर वडिलांना कोरोना झाला असावा आणि हे जर आपण बाहेर कुणाला सांगितले तर आपल्यालाही क्वारंटाईन केलं जाईल या भीतीने 1 ऑगस्टपासून वडिलांचा मृतदेह राहत्या घरातील बेडवरच ठेवण्यात आला. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून मृतदेहाच्या शेजारी डाम्बर गोळी, कापूर, अगरबत्ती लावून सर्व कुटुंब हे घरातच मृतदेहाशेजारी बसून होते. इमारतीमधील राहिवाशांना याचा वास येत होता. रहिवाशांनी सेक्युरिटी सभासदांना सांगितले. त्यानंतर पोलिसांना बोलविण्यात आले. नंतर पोलीस घटनास्थळावर आल्यावर संबंधित प्रकार उघडकीस आला.

मुलीच्या जबाबानंतर संबंधित प्रकरण उघड

याच कुटुंबातील 40 वर्षीय विद्या साहकार या तरुणीचा मृतदेह काल (3 ऑगस्ट) विरारच्या नवबापूर समुद्र किनाऱ्यावर सापडला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला. या दरम्यान आज सकाळी दुसरी मुलगी स्वप्नल ही देखील आत्महत्या करण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर गेली. पण स्थानिक नागरिकांनी तिला वाचविले. वाचलेल्या मुलीच्या जबाबावरुन सर्व घटना समोर आली आहे.

हेही वाचा :

तरुणाचे वर्तन संशयास्पद, पोलिसांनी हिसका दाखवताच पुण्यात तरुणाकडे पिस्तुल सापडले

पत्नीसोबत भांडण, जातपंचायतीचा नवऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा आदेश, नंतर पतीकडे दोन लाखांची मागणी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI