पत्नीसोबत भांडण, जातपंचायतीचा नवऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा आदेश, नंतर पतीकडे दोन लाखांची मागणी

रोहित पाटील

रोहित पाटील | Edited By: चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Aug 04, 2021 | 4:09 PM

भारत देश जगात एकीकडे अनेक गोष्टींमध्ये प्रगतशील कामगिरी करत असताना दुसरीकडे जातपंचायतीचं कीड काही केल्या संपताना दिसत नाही.

पत्नीसोबत भांडण, जातपंचायतीचा नवऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा आदेश, नंतर पतीकडे दोन लाखांची मागणी
पत्नीसोबत भांडण, जातपंचायतीचा नवऱ्यावर बहिष्कार टाकण्याचा आदेश, नंतर पतीकडून दोन लाखांची मागणी

सोलापूर : भारत देश जगात एकीकडे अनेक गोष्टींमध्ये प्रगतशील कामगिरी करत असताना दुसरीकडे जातपंचायतीचं कीड काही केल्या संपताना दिसत नाही. मात्र पोलिसांनी मनावर घेतलं तर अशा गोष्टींना चांगलाच आळा बसू शकतो. हे सोलापुरात समोर आलं आहे. गोंधळी समाजातील एका तरुणास तीन वर्षांपासून समाजातून वाळीत टाकण्यात आले होते. विशेष म्हणजे जातपंचायतीचा वाळीत टाकण्याचा निर्णय मागे घ्यावा, असं वाटत असेल तर 2 लाख दे, अशी मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी 4 पंचांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

जुन्या काळातील चुकीच्या रुढी-परंपरा नष्ट व्हाव्यात, माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळावी, यासाठी शासनाने अनेक कायदे केले आहेत. पण याची खरंच अंमलबजावणी होते का? हा प्रश्न अनेक वेळेस पडतो. अशीच एक घटना सोलापूर शहरात घडली आहे. जातपंचायतीकडून होणाऱ्या अन्यायाचे प्रकार उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशात सर्रासपणे पाहायला मिळतात. त्यासंदर्भात गुन्हे देखील दाखल होतात. सोलापुरात देखील गोंधळी समाजामध्ये असाच प्रकार घडला आहे.

सांगली येथे राहणाऱ्या शरणीदास पांडुरंग भोसले याचे आपल्या पत्नीबरोबर मागील चार वर्षांपूर्वी घरगुती कारणावरुन भांडण झालं होतं. हा वाद सोलापुरातील गोंधळी वस्तीतील गोंधळी समाज पंचांच्या पंचायत समोर मांडण्यात आला. यावेळी पंचांनी योग्य तो न्याय न करता शरणीदास भोसले याच्यावर अन्याय केल्याची तक्रार भोसले यांनी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.

जातपंतायतीच्या चार पंचाना बेड्या

हे प्रकरण मिटवतो आणि तुझ्या पत्नीस नांदावयास पाठवतो, आम्हाला दोन लाख रुपये दे, अशी मागणी गोंधळी समाजाचे पंच राम धोडिंबा शिंदेपाटील, अशोक शिंदेपाटील, नाना शिंदेपाटील, संतोष राम शिंदे, उत्तम शिदे, यांनी केल्याची तक्रारही भोसले यांनी दिली. पोलिसांनी चारही पंचांना बेड्या ठोकल्या आहेत.

जातपंचायतीच्या त्रासामुळे आजही अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून अशा चुकीच्या रुढी-परंपरांवर आळा घालणे गरजेचे आहे. तरच देशाचा सामाजिक विकास होईल.

हेही वाचा :

दहावीचा ऑनलाईन क्लास सुरु असताना अचानक अश्लील व्हिडीओ स्क्रिनवर, शिक्षिकेसह विद्यार्थी बुचकळ्यात

तरुणाचे वर्तन संशयास्पद, पोलिसांनी हिसका दाखवताच पुण्यात तरुणाकडे पिस्तुल सापडले

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI