Mumbai Crime : मुंबईतील धारावीत नात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर वडिल आणि भावाकडून अत्याचार

Mumbai Crime : मुंबईतील धारावीत नात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर वडिल आणि भावाकडून अत्याचार
लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला

पीडित अल्पवयीन मुलीचे गेल्या दोन वर्षापासून वडिल आणि मोठ्या भावाकडून लैंगिक शोषण सुरु होते. अखेर या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने आपल्या शिक्षिकेला याबाबत माहिती दिली. यानंतर शिक्षिकेच्या मदतीने हिंमत करुन पीडितेने धारावी पोलीस ठाण्यात वडिल आणि भावाविरोधात तक्रार दाखल केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 19, 2022 | 7:00 PM

मुंबई : अल्पवयीन मुलीवर वडिल आणि मोठ्या भावाकडून दोन वर्ष लैंगिक अत्याचार होत असल्याची नात्याला काळिमा फासणारी लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपी वडिल आणि भावाला अटक केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 22 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दोन वर्षापासून सुरु होता अत्याचार

पीडित अल्पवयीन मुलीचे गेल्या दोन वर्षापासून वडिल आणि मोठ्या भावाकडून लैंगिक शोषण सुरु होते. अखेर या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने आपल्या शिक्षिकेला याबाबत माहिती दिली. यानंतर शिक्षिकेच्या मदतीने हिंमत करुन पीडितेने धारावी पोलीस ठाण्यात वडिल आणि भावाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर धारावी पोलिसांनी वडिल आणि भावाच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

औरंगाबादेतही अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना

आई कामानिमित्त बाहेर गेली असताना मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून घरमालकाने घरात घुसून मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना आज औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. यावेळी पीडित मुलीने आरडओरडा केल्याने शेजारी धावून आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी घरमालकाला अटक केली आहे. भरत गिरीश मेहता असे अचक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. औरंगाबादमधील श्रीकृष्ण नगरमध्ये भरत मेहता हा राहतो. इथे त्याच्या घरात विविध आठ भाडेकरु राहतात. पीडित मुलगीही तिच्या आईसोबत मेहताच्या घरी भाड्याने राहते.

मुलीने आरडाओरडा केलयाने शेजारी धावले

सोमवारी संध्याकाळी पीडितेची आई कामानिमित्त घराबाहेर गेली होती. यावेळी पीडिता एकटीच घरी असल्याची संधी साधून भरत हा तिच्या घरी आला आणि तिच्याशी गैरवर्तन करु लागला. मुलीने आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आल्यावर आरोपी तेथून पळून गेला. ( a minor girl abuse by a father and brother in Dharavi, Mumbai)

इतर बातम्या

Bihar Incident : बिहारमध्ये बोट दुर्घटना, 24 शेतकरी गंडक नदीत बुडाले, दोघांते मृतदेह सापडले

Pune crime |अपहरणाची माहिती सांगण्यासाठी मागितली 2 लाखांच्या खंडणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें