AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : महिलांचे अश्लील व्हिडिओ पाठवायचा, ब्लॅकमेल करुन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला अटक

आरोपी रवी दांडू महिलांचे आणि तरुणींचे मोबाईल नंबर हॅक करायचा. त्यानंतर महिलांना आणि तरुणींना मोर्फ केलेलं अश्लील व्हिडीओ, फोटो पाठवत असे. अश्लील फोटो आणि व्हिडीओद्वारे त्यांची बदनामी करण्याची धमकी देत आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा.

Mumbai Crime : महिलांचे अश्लील व्हिडिओ पाठवायचा, ब्लॅकमेल करुन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला अटक
महिलांना अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करुन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला अटकImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 22, 2022 | 10:25 PM
Share

मुंबई : महिलांना आणि तरुणींना अश्लीस मॅसेज (Message) आणि व्हिडिओ (Video) पाठवून ब्लॅकमेल (Blackmail) करणाऱ्या नराधमाच्या अंधेरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रवी दांडू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो धारावी येथे राहतो. तो एका खाजगी कंपनीत डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करतो. आरोपीने आतापर्यंत 600 हून अधिक महिलांना अश्लील मॅसेज आणि व्हिडिओ पाठवले आहेत. याबाबत एका अल्पवयीन मुलीने तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केले.

आरोपी रवी दांडू महिलांचे आणि तरुणींचे मोबाईल नंबर हॅक करायचा. त्यानंतर महिलांना आणि तरुणींना मोर्फ केलेलं अश्लील व्हिडीओ, फोटो पाठवत असे. अश्लील फोटो आणि व्हिडीओद्वारे त्यांची बदनामी करण्याची धमकी देत आपल्याशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा. मात्र सायन येथील राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आरोपी दांडूला अंधेरी पोलिसांनी अटक केली आहे.

एका महाविद्यालयीन विद्यार्थीने दिलेल्या तक्रारीनंतर प्रकरण उघडकीस

आरोपी हा विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक मिळवायचा आणि त्यांना ब्लॅकमेलिंग करायचा. विलेपार्ले येथील महाविद्यालयात शिकणाऱ्या पिडीत मुलीला फोन करत स्वतः विद्यार्थी असल्याचे सांगायचा. व्हॉट्सअँप ग्रुप बनवत आहे, असे सांगत अभ्यास सामग्रीची देवाणघेवाण करण्यासाठी ग्रुपमध्ये अॅड व्हायला तगादा लावला. मुलीने व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील होण्यास सहमती दिली. त्यानंतर आरोपीने मुलीला एक लिंक पाठवली आणि तिला तिच्या फोनवर प्राप्त होणारा वन टाईम पासवर्ड ओटीपी परत करण्यास सांगितले. तिने त्याला ओटीपी दिल्यानंतर आरोपीने तिचे व्हॉट्सअॅप अकाउंट अॅक्सेस केले. तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कॉलेज आणि फ्रेंड सर्कलमधील किमान 35 व्यक्तींना अश्लील व्हिडिओ पाठवले. आरोपीने तिचे फोटो मॉर्फ केले आणि व्हिडिओमध्ये वापरले. त्यानंतर आरोपीला एकांतात भेटण्यासाठी पिडीत मुलीला ब्लॅकमेल केले. मात्र पोलिसांनी त्या तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केले आहे. (Accused of blackmailing women by sending obscene messages arrested)

हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने
हजारो आदिवासी व शेतकऱ्यांचे ‘लाल वादळ’ मंत्रालयाच्या दिशेने.
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.