AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : ‘क्रूझ ड्रग्ज पार्टी ते निनावी लेटर बॉम्ब’, आर्यन खानचं संपूर्ण प्रकरण जाणून घ्या एका क्लिकवर

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी एक मोठी कारवाई केली. कार्डेलिया या प्रवासी जहाजावर ही कारवाई केली. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना अटक केली. तिघांकडे काही प्रमाणात गांजा, एमडी ड्रग्स सापडलं.

Special Report : 'क्रूझ ड्रग्ज पार्टी ते निनावी लेटर बॉम्ब', आर्यन खानचं संपूर्ण प्रकरण जाणून घ्या एका क्लिकवर
'क्रूझ ड्रग्ज पार्टी ते निनावी लेटर बॉम्ब', आर्यन खानचं संपूर्ण प्रकरण जाणून घ्या एका क्लिकवर
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 6:05 PM
Share

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बाबत वाद सुरू आहे. त्यांच्या विरोधात अनेक आरोप केले जात आहेत. समीर वानखेडे हे गेल्या सव्वा वर्षापासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर आहेत. मात्र, आताच हा वाद का ? कधी ? कसा आणि कोणत्या कारणामुळे हा वाद सुरू झाला, याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी एक मोठी कारवाई केली. कार्डेलिया या प्रवासी जहाजावर ही कारवाई केली. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना अटक केली. तिघांकडे काही प्रमाणात गांजा, एमडी ड्रग्स सापडलं. (Cruise Drugs Party to Anonymous Letter Bomb, know the whole story of Aryan Khan with one click)

पहिल्यांदा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना करावा लागला खुलासा

आर्यन खान हा अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आहे. यामुळे प्रकरण चर्चेत आलं. आर्यन खान याला क्रूझवरून एनसीबी कार्यलयात आणलं. आर्यन खान हा एनसीबी कार्यलयात असताना एनसीबीचा पंच असणाऱ्या किरण गोसावी याचा आर्यन सोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. इथूनच या प्रकणाला वळण मिळालं, प्रकरण चर्चेत आलं. किरण गोसावी हा फरार आरोपी असल्याचं उघडकीस आल्यावर एनसीबीवर टीका होऊ लागली. यावेळी पहिल्यांदाच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेऊन गोसावीबाबत खुलासा करावा लागला होता.

क्रूझवर पकडलेल्या 14 जणांपैकी 3 लोकांबाबत कोणताही खुलासा नाही

एव्हाना हे प्रकरण चांगलंच तापलं होतं. यावेळी एनसीबीवर आणखी एक आरोप झाला. आर्यन खान आणि त्याच्यासह एकूण 11 जणांना एनसीबीने अटक केली होती. तर तीन जणांना एनसीबीने सोडून दिलं होतं. याच मुद्यावर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा आरोप केला की, कार्डेलिया क्रूझवर 11 नाही तर 14 लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी 11 जणांना अटक केली तर रिषभ सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं होतं. यापैकी एक जण भाजप नेत्याचा नातेवाईक असल्याचा आरोप झाला होता. त्यावर ही एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याना खुलासा करावा लागला होता. आपण 11 नाही तर 14 जणांना ताब्यात घेतल्याचा खुलासा करीत बाकीच्या लोकांबाबत एनसीबीने पूर्ण खुलासा केला नाही.

एनसीबी पंच किरण गोसावी वादाला सुरुवात

एका बाजूला जहाजावर किती लोकांना पकडलं याचा वाद सुरू असतानाच पुन्हा दुसरा एक वाद निर्माण झाला तो होता पंचाबाबत. एनसीबीचा एक पंच किरण गोसावी हा क्रिमिनल आहे. त्याच्याही विरोधात गुन्हे दाखल आहेत. लोकांना नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात तो 2017 साला पासून फरार आहे. दुसरा पंच मनिष भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता आहे. याबाबत ही टीका झाली. तर पंच असणाऱ्या फ्लेचर पटेल बाबतही टीका झाली. आणखी एक पंच फ्लेचर पटेल बाबत ही वाद झाला. फ्लेचर पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल असल्याची टीका करण्यात आली.

एनसीबी अधिकाऱ्याकडून निनावी लेटर बॉम्ब

ही सर्व प्रकरणे अजून शमलीही नाहीत तोवर चक्क एक एनसीबी अधिकाऱ्याने निनावी एक लेटर बॉम्ब टाकला आहे. एका नाराज एनसीबी अधिकाऱ्याने एक पत्र तयार करून ते सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि नवाब मलिक यांना पाठवलं आहे. या पत्रात समीर वानखेडे आणि त्यांचे सहकारी कशा खोट्या केसेस बनवत आहेत. कसे पैसे कमावत आहेत. या रॅकेटमध्ये कोणकोण आहे, पैसे कोणाकोणाला जातात, याबाबत सविस्तर लिहलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार, अस म्हटलं जातं आहे. (Cruise Drugs Party to Anonymous Letter Bomb, know the whole story of Aryan Khan with one click)

इतर बातम्या

Pegasus Spying:स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आदेश

दोन मुलांच्या आईला प्रपोज, नकारानंतर 21 वर्षीय तरुणातला सैतान जागा, कुऱ्हाडीचे सपासप वार

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....