सायबर गुन्हेगारांची नवी ट्रिक, निवृत्त कर्मचाऱ्यांना लक्ष्य, मुंबईत एका कर्मचाऱ्याला दीड कोटींनी फसवलं

ब्रिजभान जैस्वार

| Edited By: |

Updated on: Sep 05, 2021 | 5:59 PM

आपली वाटचाल डिजीटल इंडियाकडे होत असली तरी सावध राहणं जास्त आवश्यक आहे. कारण सायबर भामट्यांच्या फसवणुकीच्या नवनवीन पद्धती समोर येत आहेत.

सायबर गुन्हेगारांची नवी ट्रिक, निवृत्त कर्मचाऱ्यांना लक्ष्य, मुंबईत एका कर्मचाऱ्याला दीड कोटींनी फसवलं
प्रातिनिधिक फोटो
Follow us

मुंबई : आपली वाटचाल डिजीटल इंडियाकडे होत असली तरी सावध राहणं जास्त आवश्यक आहे. कारण सायबर भामट्यांच्या फसवणुकीच्या नवनवीन पद्धती समोर येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडून आता निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष केलं जात आहे. कारण याचं ताजं उदाहरण म्हणजे मुंबईत एका केंद्रीय निवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगाराकडून दीड कोटी रुपयांनी फसवण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

सायबर भामट्यांपासून सध्या अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. कारण हे भामटे लोकांना विविध कारणे सांगून आपल्याला जाळ्यात अटकवतात. विश्वास पटवून देतात आणि नंतर फसवणूक करतात. अशाच प्रकारे एक 60 वर्षीय माजी वरिष्ठ सरकारी अधिकारी, जे काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते, त्यांनी सायबर फसवणूक टोळीच्या आमिषाला बळी पडून 1.14 कोटी रुपये गमावले. या प्रकरणी पूर्व विभाग सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी एफआयआर नोंदवला आहे.

आरोपींनी कसं फसवलं?

तक्रारदार हे अणुशक्ती नगरचे रहिवासी आहेत. काही महिन्यांपूर्वी जवळपास नऊ सदस्यांच्या सायबर फसवणूक गटाने केंद्र सरकारच्या कर्मचारी विमा योजनेच्या (सीजीईआयएस) विविध विभागांमधून कर्मचारी म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी स्वतःला विमा योजनेचा एक्झिक्युटिव्ह भासवलं. तसेच आपण शासकीय विमा योजनेत 4 लाख रुपयांचे प्रीमियम भरण्यात अपयशी ठरले आहात, ज्यामध्ये सदर विमाची रक्कम परिपक्वता झाल्यास त्यात कोट्यवधी रुपये तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर चांगला बोनसही मिळेल, असं आमिष दाखवलं.

तसेच जर पैसे भरले नाहीत तर तुमची पॉलिसी रद्द होईल. तसेच जमा केलेले पैसे सुद्धा लेप्स होणार, असं सांगत सायबर भामट्यांनी पीडित व्यक्तीकडून कधी प्रोसेस फीस तर कधी टॅक्स तर कधी दंडाच्या नावावर जवळपास 1 कोटी 14 लाख रुपए जमा करुन घेतले. आरोपींपैकी अनेक जण पीडित व्यक्तीला भेटले आणि आपलं नाव अंजली वर्मा, माथुर, पी. श्रीवास्तव, आरके नारायण, एसएन महापात्रा, गीता शाह, रविंद्र दास, राकेश मेहता आणि रघुनाथ शाह असं सांगितलं होतं.

दोन आठवड्यांनी पीडित व्यक्तीसमोर खरं उघड

पैसे भरल्यानंतर जेव्हा दोन आठवडे निघून गेले तेव्हा पीडित व्यक्ती संबंधित विमा कंपनीच्या कार्यलयात गेले. तिथे त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्यांना जाणून आश्चर्याचा धक्काच बसला की त्यांना जे नाव सांगितलं गेला होतं त्या नावाचा तिथे कोणीच अधिकारी नव्हता. तेव्हा त्यांनी ईस्ट रीजन सायबर पोलीस ठाण्यात 9 आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांना संशय आहे की, या सायबर फ्रॉड गँगकडे अशा अनेक लोकांची यादी असेल जे लवकरच सेवानिवृत झाले असतील.

तक्रारदाराची प्रतिक्रिया

या प्रकरणावर तक्रारदाराने प्रतिक्रिया दिली. “मी नुकताच सेवानिवृत्त असल्याने मला लक्ष्य करण्यात आले. मात्र सध्या तपास सुरु आहे म्हणून मी जास्त काही बोलणार नाही आणी जे काही माहिती द्यायची आहे ती मी पोलिसाना दिली आहे. पोलीस हे आरोपींच्या शोधात आहेत. मात्र सर्वसामान्य लोकांनी अशा सायबर भामट्यांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचं आहे”, अशी भूमिका तक्रारदाराने मांडली.

हेही वाचा :

सेक्स चेंज ऑपरेशनसाठी पैसे न दिल्याचा राग, गे पार्टनरच्या साथीने हत्या, हरियाणातील सामूहिक हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा

‘मम्मीसोबत प्रेमसंबंध ठेवतोस?’, आईच्या प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी तरुणीचा चुकीचा मार्ग, लाखोंची खंडणी

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI