मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई

गँगस्टर सोनू पठाणच्या विरोधात 10 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 7 गुन्हे मुंबई पोलिसात, तर 3 गुन्हे एनसीबीमध्ये दाखल आहेत. सोनू हा अनेक प्रकरणात फरार आरोपी होता.

मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई
Gangster Sonu Pathan
ब्रिजभान जैस्वार

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 05, 2021 | 12:34 PM

मुंबई : मुंबईतील मोठा गँगस्टर सोनू पठाणला (Gangster Sonu Pathan) अटक करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पथकाने मध्यरात्री सोनूला बेड्या ठोकल्या. मैत्रिणीला भेटायला आला असताना सोनू एनसीबीच्या जाळ्यात अडकला. सोनू पठाण हा मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या पठाण गॅंगचा म्होरक्या आहे (Dongri Pathan Gang Gangster Sonu Pathan arrested by Sameer Wankhede led NCB team)

मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची टिप

गँगस्टर सोनू पठाणच्या विरोधात 10 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 7 गुन्हे मुंबई पोलिसात, तर 3 गुन्हे एनसीबीमध्ये दाखल आहेत. सोनू हा अनेक प्रकरणात फरार आरोपी होता. सोनू मध्यरात्री आपल्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सापळा लावून सोनू पठाण याला अटक केली.

चिंकूच्या चौकशीत सोनू पठाणचं नाव

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना चिंकू पठाण याच्याशी संबंधित होता. त्यावेळी चिंकू पठाण याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सोनू पठाणचंही नाव आल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर काल त्याला मध्यरात्री अटक करण्यात आली. अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.

ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवाला याला जानेवारीत एनसीबीने अटक केली होती. अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणला एनसीबीने आधी गजाआड केलं होतं. चिंकू पठाणच्या चौकशीत आरिफ भुजवाला आणि त्याच्या ड्रग्ज फॅक्टरीची माहिती समोर आली होती. त्यानंतर दाऊदच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या भुजावालाला पकडण्याची योजना एनसीबीने आखली होती.

संबंधित बातम्या :

समीर वानखेडेंची आणखी एक धडाकेबाज कामगिरी, थेट दाऊदच्या भावाला बेड्या

दाऊदच्या डोंगरीत घुसून धडक कारवाई, एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ

(Dongri Pathan Gang Gangster Sonu Pathan arrested by Sameer Wankhede led NCB team)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें