AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतं, ईडी कोर्टाचं निरीक्षण

एकनाथ खडसेंनी मंत्री असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करवून दिला, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थिती आरोपीला जामीन देता येणार नाही अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असं कोर्टाने ठणकावून सांगितलं.

खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतं, ईडी कोर्टाचं निरीक्षण
एकनाथ खडसे
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 9:27 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्राथमिकदृष्ट्या पाहता एकनाथ खडसेंनी पुणे जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय, असं स्पष्ट निरीक्षण ईडी कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे खडसेंचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.

ईडी कोर्टाचं निरीक्षण काय?

एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदावर असताना पदाचा गैरवापर करत स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना फायदा करुन दिला, असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अशा परिस्थितीत जामीन देता येणार नाही, अन्यथा समाजात वाईट संदेश जाईल, असंही कोर्टाने ठणकावून सांगितलं.

“गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते”

कोर्टाने असंही म्हटलंय की या गोष्टीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही, की खडसे हे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा भाग आहेत, मात्र हा गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते.

पाहा व्हिडीओ :

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

जावई गिरीश चौधरींना बेड्या

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना 6 जुलै 2021 रोजी अटक करण्यात आली होती. 13 तास कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना बेड्या ठोकल्या होत्या, चौधरींना दोन महिन्यांनंतरही जामीन मिळालेला नाही. त्याचवेळी खडसेंनाही अटक होण्याची शकत्या वर्तवण्यात येत होती.

जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोच एकनाथ खडसे यांना देखील ईडीने समन्स बजावलं होतं. त्यानंतर ईडी कार्यालयात एकनाथ खडसेंची चौकशीही झाली होती. ईडीला संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका यावेळी त्यांनी घेतली होती.

संबंधित बातम्या :

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात, भोसरी एमआयडी जमीन घोटाळ्याची चौकशी

एकनाथ खडसे सध्या सत्ताधारी गटात असले तरी गुन्हा घडताना ते भाजपमध्ये होते : ईडी कोर्ट

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.