Eknath Khadse : एकनाथ खडसेंचे पुणे-सुरतमधील फ्लॅट जप्त, गोठवलेल्या अकाऊंटमधील रक्कम किती?

मनी लाँडरिंग (Money laundering ) कायद्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे.

Eknath Khadse : एकनाथ खडसेंचे पुणे-सुरतमधील फ्लॅट जप्त, गोठवलेल्या अकाऊंटमधील रक्कम किती?
एकनाथ खडसे


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची सुमारे पावणे सहा कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने (ED) जप्त केली. त्याचप्रमाणे एक बँक खाते गोठवलं. त्यात 86 लाख रुपये आहेत. मनी लाँडरिंग (Money laundering ) कायद्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याविरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंतची ही मोठी कारवाई आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी 27 ऑगस्ट रोजी एकनाथ खडसे यांची पाच कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली.

कोणकोणती मालमत्ता जप्त?

  • पुणे येथील एक फ्लॅट
  • सुरत येथील एक फ्लॅट
  • जळगाव येथील जमीन जी मंदाकिनी खडसे आणि एकनाथ खडसे यांच्या नावावर आहे.
  • लोणावळा येथील बंगला. हा बंगला मंदाकिनी खडसे यांच्या नावावर आहे.
  • त्याचप्रमाणे एक बँक खाते फ्रीज करण्यात आलं आहे. या खात्यावर सुमारे 86 लाख रुपये आहेत.

एकनाथ खडसेंविरुद्ध गुन्हा

एकनाथ खडसे यांच्याविरोधात MIDC जमीन घोटाळा प्रकरणात 2015 सालात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील भोसरी MIDC येथील जमीन खडसे यांच्या जावयाने खरेदी केली होती. अंदाजे साडे तीन एकर जमीन केवळ तीन कोटी 75 लाख रुपयांना विकत घेण्यात आली होती. प्रत्यक्षात या जमिनीची किंमत 31 कोटी रुपये होती. यावेळी जमीन खरेदीत गैर व्यवहार झाल्याची तक्रार अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानुसार पुणे येथील बंड गार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सुरुवातीला ACB ने केला होता. हाच गुन्हा पुढे ईडीने तपासासाठी घेतला आहे.

ईडीच्या रडारवर कोण कोण?

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याशी एकनाथ खडसे , त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे , जावई गिरीश खडसे , मुलगी शारदा खडसे हे संबंधित आहेत.  याचमुळे या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना 7 जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. चौधरी सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत. तर एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबर 2020 आणि 15 जानेवारी 2021 या तारखांना समन्स बजावण्यात आलं होतं.

खडसे 15 जानेवारी 2021 रोजी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर झाले होते. या दिवशी एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी शारदा यांची सुमारे सहा तास चौकशी झाली होती. त्यानंतर 7 जुलै रोजी खडसे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. यावेळीही खडसे यांची बराच वेळ चौकशी झाली होती. या बाबत ईडीचा तपास सुरूच आहे. या तपासात महत्वाची माहिती उघडकीस आल्यानंतर ईडीने आता ही कारवाई केली आहे.

VIDEO : ईडीचा एकनाथ खडसेंना मोठा झटका

संबंधित बातम्या  

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना ईडीचा धक्का, लोणावळा, जळगावातील संपत्ती जप्त

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI