मी शिवसेनेचा, संतोष माझा जुना खबरी, प्रदीप शर्मांचा NIA कोर्टात युक्तीवाद, तिघांना 28 जूनपर्यंत कोठडी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: भीमराव गवळी, Tv9 मराठी

Updated on: Jun 17, 2021 | 4:31 PM

अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Former encounter specialist Pradeep Sharma) यांच्यासह मनीष सोनी आणि सतीष मोटेकरीला 28 जूनपर्यंत एनआयए कोर्टाने कोठडी सुनावली आहे.

मी शिवसेनेचा, संतोष माझा जुना खबरी, प्रदीप शर्मांचा NIA कोर्टात युक्तीवाद, तिघांना  28 जूनपर्यंत कोठडी
pradeep sharma

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई: अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह मनीष सोनी आणि सतीष मोटेकरीला 28 जूनपर्यंत एनआयए कोर्टाने कोठडी सुनावली आहे. मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. संतोष हा माझा जुना खबरी असल्याचं सांगतानाच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशी माझा काहीच संबंध नसल्याचं प्रदीप शर्मा यांनी कोर्टात स्पष्ट केलं आहे. (Former encounter specialist Pradeep Sharma, 2 others remanded till June 28)

प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरासहीत त्यांच्या कार्यालयावर एनआयएने आज पहाटेच छापे मारले होते. त्यानंतर शर्मा यांची पुन्हा चौकशी करून त्यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शर्मा यांच्यासह मनीष सोनी आणि सतीष मिटकरीला एनआयए कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने या तिघांनाही 28 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.

आधीही तपास झाला

यावेळी शर्मा यांच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला. एनआयएने शर्मा यांचा यापूर्वीच जबाब नोंदवला होता. त्याच वेळी बँक डिटेल्स, सीडीआर हा देखील काढला होता. त्यात काही निष्पन्न न झाल्यामुळे त्यांना सोडलं होतं, असा युक्तिवाद शर्मा यांच्या वकिलाने केला.

घरात रिव्हॉल्व्हर सापडली

तर सचिन वाझे याच्यासोबत शर्मा यांचा या गुन्ह्यात सहभाग होता. सतीष, मनीष, रियाज, संतोष आणि आनंद यांचाही या हत्या प्रकरणात सहभाग होता. सचिन वाझे आणि शर्मा यांनी कट रचून पुरावे नष्ट केले. हिरेन हत्येनंतर सर्व आरोपी शर्मांच्या संपर्कात होते. मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळून पैसेही जप्त केले आहेत, असा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. प्रदीप शर्मा हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या घरातून एक रिव्हॉल्व्हर मिळाली आहे. ज्याचं लायसन्सची मुदत संपलेली आहे, असंही तपासात आढळून आलं आहे.

मी थांबलो असतो का?

1997मध्ये मी रिव्हॉल्व्हर विकत घेतलं आहे. माझा हत्या प्रकरणात सहभाग असता तर मी थांबलो असतो का? असं शर्मा यांनी कोर्टात सांगितलं. तसेच वाझेशी काहीही संबंध नसल्याचं सांगतानाच मागच्यावेळी मला चौकशीला बोलावण्यात आलं तेव्हा एका चॅनेलकडून माझा पाठलाग करण्यात आला होता, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं.

मी सेनेचा आहे

अँटालिया आणि हिरेन प्रकरणात ज्या चौघांना पकडलं आहे. त्यांना मी ओळखत नाही. त्यांच्याशी माझा काहीच संबंध नाही. संतोष हा माझा जुना खबरी आहे, असं सांगतानाच मी शिवसेनेचा आहे, असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. त्यावेळी ते कोर्टात भावूक झाले होते.

शर्मा मास्टर माईंड

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) हे हत्या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शर्मांसोबत अटक केलेल्या दोघा आरोपींनी यासंदर्भात दावा केला आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच आपण मनसुख हिरेनची हत्या केली, असा दावा सतीश आणि मनिष या आरोपींनी केल्याचं एनआयएच्या वकिलांनी सांगितलं. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती.

कोर्टात NIA ने दिलेली माहिती:

शर्मा यांच्या घरातून एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे मिळाली आहेत. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे आणि पिस्तुल कशासाठी?, असा प्रश्न NIA ने कोर्टात उपस्थित केलाय.

शर्मा यांनी दिलेलं उत्तर- 1997 साली हे पिस्तुल मला मिळालं होतं. यासंदर्भातले सगळे पुरावे आणि कागदपत्रे माझ्याकडे आहेत. त्या पिस्तुलचे लायसन्स माझ्याकडे आहे. फक्त ते मला रिन्यू करता आलं नाही. पण त्याची प्रोसिजर बाकी आहे.

NIA कोर्टात – मनसुखची हत्या ज्या दिवशी झाली तेव्हा वाझेंने त्याला फोन करून घोडबंदर रोडला बोलवलं होत. त्यावेळी वाझेसोबत सुनील माने होते. दोघासोबत मनसुख गाडीत बसला आणि त्यानंतर मनसुखला वाझे आणि माने याने इतर आरोपीकडे सोपवल. मनसुखला ज्या गाडीत बसवण्यात आले ती गाडी आरोपी मनीष सोनी चालवत होता. त्याच गाडीत आरोपी सतीश, संतोष शेलार आणि आनंद जाधव होते. त्यांनी मनसुखची हत्या केली असा आम्हाला संशय आहे. आम्हाला न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपी सुनील मानेची पुन्हा कोठडी हवी आहे. जेणेकरून या आरोपीना समोरासमोर बसवॉून आम्ही चौकशी करू शकू. (Former encounter specialist Pradeep Sharma, 2 others remanded till June 28)

संबंधित बातम्या:

वाझे आणि प्रदीप शर्मांच्या सांगण्यावरुन मनीष आणि सतीशकडून मनसुख हिरेन यांची हत्या, NIA चा दावा

Pradeep Sharma | NIA ची सर्वात मोठी कारवाई, प्रदीप शर्मा यांना अटक, आतापर्यंत किती जणांना बेड्या?

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

(Former encounter specialist Pradeep Sharma, 2 others remanded till June 28)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI