AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे.

Pradeep Sharma | एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक
चकमक फेम प्रदीप शर्मा
| Edited By: | Updated on: Jun 17, 2021 | 2:01 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई : एन्काऊण्टर स्पेशलिस्ट अशी ख्याती असलेले मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएने शर्मांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली. अँटिलिया केस आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात छापेमारी सुरु असून शर्मांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (former Mumbai Police officer Encounter Specialist Pradeep Sharma detained by NIA for enquiry)

प्रदीप शर्मा यांना लोणावळ्यातील रिसॉर्टमधून ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आज सकाळी ताब्यात घेतल्यानंतर NIA ने त्यांना दुपारी अटक केली. आता NIA प्रदीप शर्मांना कोर्टात हजर करुन कोठडीची मागणी करणार आहे.

शर्मांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था

प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. एनआयए कार्यालयात त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्य राखीव दलाचं पथक शर्मांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलं आहे. प्रदीप शर्मा यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी

मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेख हत्या प्रकरणात याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याची शक्यता असून मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा ?

एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी 113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव 1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात करण्यात रूजू आलं 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती

संबंधित बातम्या :

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी, गुन्हा दाखल

जेबी नगर लोकेशनवरुन दुवा जुळला, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या रडारवर

(former Mumbai Police officer Encounter Specialist Pradeep Sharma detained by NIA for enquiry)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.