AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चलो अॅपचा पास काढून मुंबई फिरायचे, बसमध्ये प्रवाशांचे खिसे कापायचे; पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली पूर्व ओंकारेश्वर बस स्थानकाजवळ एका टोळीचे काही लोक खिसे कापण्यासाठी येत असल्याची माहिती युनिटला मिळाली होती.

चलो अॅपचा पास काढून मुंबई फिरायचे, बसमध्ये प्रवाशांचे खिसे कापायचे; पोलिसांनी 'अशा' आवळल्या मुसक्या
बसमध्ये प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंदImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Oct 18, 2022 | 9:05 PM
Share

मुंबई : बेस्टच्या चलो अॅपवर बसचा पास काढायचे आणि मुंबईत सर्वत्र बसने प्रवास करत प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळक्याच्या मुसक्या आवळण्यास मुंबई गुन्हे शाखेला (Crime branch arrested thief gang) यश आले आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट 12 च्या पथकाने ही कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून बेस्ट बसचे 4 “चलो अॅप” पास (Chalo app pass) आणि 2 कटर (Two Cutter Seized) जप्त केले आहेत.

गु्प्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रचला सापळा

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरीवली पूर्व ओंकारेश्वर बस स्थानकाजवळ एका टोळीचे काही लोक खिसे कापण्यासाठी येत असल्याची माहिती युनिटला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचला.

नमूद आरोपी ओंकारेश्वर बस स्थानकाजवळ येताच आधीच सापळा लावून बसलेल्या पोलिसांची आरोपींना चाहूल लागली. यामुळे सर्व आरोपी तेथून पळून जाऊ लागले. मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत सर्वांना पकडले.

आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन फोल्डींग कटर, चार मोबाईल आणि चार चलो अॅपचे पास आढळून आले. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी बसमध्ये मुंबईभर फिरायचे आणि लोकांच्या खिशातील पैसे चोरायचे, असे कबुल केले.

राजाराम रामदास पाटील, महादेव बसंत माने, अब्दुल कादर शाह, मोहम्मद रफिक वकील शेख, संजय प्रभाकर त्र्यंबक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी धारावी, मुंब्रा, सायन आणि ठाणे येथील रहिवासी आहेत.

आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

आरोपींविरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि हत्येचा प्रयत्न असे एकूण 40 गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार