मुंबई : सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या कनेक्शन (Islamic State Connections) प्रकरणात केलेल्या कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला (National Investigation Agency) शुक्रवारी मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रातील तरुणांना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या आर्शी कुरेशीला (Arshi Qureshi) आज मुंबईच्या सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले. कुरेशीविरोधात एनआयएने सबळ पुरावे दाखल केले नाहीत, असे मत व्यक्त करीत एनआयएच्या विशेष न्यायालयाने कुरेशीच्या सुटकेचा आदेश दिला आहे. कुरेशीला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.