Nikita Dutta | कबीर सिंग फेम निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला, अभिनेत्रीने शेअर केला शॉकिंग एक्सपिरिअन्स

कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपटात अभिनेता शाहीद कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री निकीता दत्तासोबत (Actress Nikita Dutta) एक भयावह घटना घडली आहे. वांद्रे (Bandra) येथे तिचा फोन (Phone Snatched) काही मोबाईल चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडलीये याबाबत अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीये. तिच्या हातातून तिचा फोन हिसकावून हे चोरटे बाईकवरुन फरार झाल्याचं तिने सांगितलं

Nikita Dutta | कबीर सिंग फेम निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला, अभिनेत्रीने शेअर केला शॉकिंग एक्सपिरिअन्स
Nikita Dutta
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 8:43 AM

मुंबई : कबीर सिंग (Kabir Singh) चित्रपटात अभिनेता शाहीद कपूरसोबत दिसलेली अभिनेत्री निकीता दत्तासोबत (Actress Nikita Dutta) एक भयावह घटना घडली आहे. वांद्रे (Bandra) येथे तिचा फोन (Phone Snatched) काही मोबाईल चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडलीये याबाबत अभिनेत्रीने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिलीये. तिच्या हातातून तिचा फोन हिसकावून हे चोरटे बाईकवरुन फरार झाल्याचं तिने सांगितलं. या घटनेने निकीता पुरती हादरली आहे. ती अद्यापही या धसक्यातून सावरलेली नाही.

निकीतासोबत नेमकं काय घडलं?

निकिता वांद्रे येथे वॉकला गेली असताना तिच्यासोबत ही घटना घडलीये. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तिचा फोन हिसकावून नेला. निकिताने सोशल मीडियावर लिहिले, ‘मला तुम्हा सर्वांसोबत काल घडलेली एक गोष्ट शेअर करायची आहे. कालचा दिवस माझ्यासाठी खूप त्रासदायक होता आणि हे 24 तास मी फक्त त्या घटनेचाच विचार करतेय. मी संध्याकाळी 7.45 वाजता वांद्र्याच्या 14 व्या रस्त्यावर चालत होते. माझ्या मागून 2 जण दुचाकीवरुन आले. त्यातील एकाने माझ्या डोक्यावर टॅप केलं, ज्यामुळे काही क्षणांसाठी माझे लक्ष विचलीत झालं आणि मग बाईकवर पुढे बसलेल्या व्यक्तीने माझ्या हातातून फोन हिसकावून घेतला. ते गाडीवर होते जेव्हा हे सर्व घडलं. माझी कुठलीही प्रतिक्रिया येईपर्यंत ते तिथून निघून गेले होते.’

‘3-4 सेकंद मला काहीच समजले नाही. मी स्वतःला सांभाळून त्यांच्या मागे धावेल तोपर्यंत ते खूप पुढे गेले होते. माझ्या आजूबाजूला असलेले लोक चांगले होते, ते तात्काळ माझ्याकडे मदतीसाठी धावलून आले. दुचाकीवर असलेल्या एका व्यक्तीने त्यांचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते बरेच पुढे निघून गेले होते. या अपघातामुळे मला जवळजवळ पॅनीक अटॅक आला होता. मी नशीबवान होते की आजूबाजूला चांगले लोक होते, ज्यांनी शांत केलं, मला पाणी प्यायला दिले, कारण माझे अश्रू थांबत नव्हते. यानंतर मी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जी काही प्रक्रिया होती ती पूर्ण केलीये.’

‘लोक जागरुक व्हावेत म्हणून मी हा मेसेज लिहित आहे. मला आशा आहे की हे इतर कोणालाही भोगावं लागणार नाही. एखाद्याने कष्टाने कमावलेला पैसा हा त्याचा काहीही दोष नसताना अशाप्रकारे चोरीला जाणे, हा अनुभव कोणाच्याही वाट्याला येऊ नये.’

वाचा निकीता दत्ताची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Nikita Dutta ? (@nikifying)

निकीताच्या या पोस्टनंतर तिचे फॅन्स तिची वाचारपूस करताना दिसत आहेत. तसेच, तिला सावरण्याचा सल्लाही देत आहेत.

संबंधित बातम्या :

सुबोध भावेंसोबत काम करतानाचा अनुभव खास, ‘विजेता’ फेम अभिनेता गौरीश शिपुरकरने व्यक्त केल्या भावना!

‘Bye Chacha Jack’, पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ होताच कंगना रनौतने जॅक डोर्सीची उडवली खिल्ली!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.