बायकोने Video Call वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज, बदलापुरात पतीची आत्महत्या

बायकोने Video Call वर मुलीचा चेहरा न दाखवल्याने नाराज, बदलापुरात पतीची आत्महत्या
बदलापुरात तरुणाची आत्महत्या
Image Credit source: टीव्ही9

होळीचा सण असल्याने तरी पत्नी मुलीला घेऊन घरी येईल अशी शंकरची अपेक्षा होती. पण पत्नी तर आली नाहीच, उलट तिने व्हिडीओ कॉलवर शंकरला मुलीचं तोंड सुद्धा दाखवलं नाही. यामुळे व्यथित होऊन शंकरने आपण आत्महत्या केली

निनाद करमरकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 19, 2022 | 8:17 AM

बदलापूर : बायकोने लहानग्या लेकीचा चेहरा दाखवला नसल्याने नाराज होऊन नवऱ्याने आत्महत्या (Suicide) केली. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) शहरात हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. माहेरी गेलेल्या पत्नीने होळी (Holi) सणाच्या दिवशीही तान्ह्या मुलीचा चेहरा व्हिडीओ कॉलवर दाखवला नाही, या गोष्टीने व्यथित होऊन तरुणाचे आत्महत्या केल्याचा आरोप आहे. मुलीचा चेहरा पाहता न आल्याने पित्याने गळफास घेत आयुष्याची अखेर केली. या दुर्दैवी घटनेमुळे हे कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालं आहे.

काय आहे प्रकरण?

बदलापूरच्या वडवली परिसरातील तलरेजा कॉलेजच्या बाजूला राजू जाधव हा तरुण त्याची पत्नी, दोन महिन्यांची मुलगी आणि आई वडिलांसह वास्तव्याला होता. मात्र पत्नीला वेगळं राहायचं असल्यानं ती शंकरसोबत वाद घालून माहेरी निघून गेली होती.

आत्महत्या करत असल्याचं बायकोला सांगितलं

होळीचा सण असल्याने तरी पत्नी मुलीला घेऊन घरी येईल अशी शंकरची अपेक्षा होती. पण पत्नी तर आली नाहीच, उलट तिने व्हिडीओ कॉलवर शंकरला मुलीचं तोंड सुद्धा दाखवलं नाही. यामुळे व्यथित होऊन शंकरने आपण आत्महत्या करत असल्याचं पत्नीला सांगितलं आणि बेडरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

कुटुंबियांना मृतावस्थेत सापडला

दुसरीकडे पत्नीने ही बाब शेजारी राहणाऱ्यांना कळवल्यानंतर शंकरच्या घरच्यांनी बेडरूममध्ये धाव घेतली असता, शंकर मृतावस्थेत आढळून आला. या घटनेमुळं शंकरचं त्रिकोणी कुटुंब उद्ध्वस्त झालंय. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केल्याची माहिती दिलीये.

संबंधित बातम्या :

Holi | रंग लावू नये म्हणून गच्चीत पळाला, इमारतीतून पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबईत मस्करीची कुस्करी, होळीला रंगांचा फुगा मारला, बाईकचा धक्का लागून सायकलस्वाराचा मृत्यू

नशीब वेळीच गाडीबाहेर पडले, नाहीतर…? Holi साठी यवतमाळहून वर्ध्याला जाताना भररस्त्यात अग्नितांडव

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें