मुंबईत मस्करीची कुस्करी, होळीला रंगांचा फुगा मारला, बाईकचा धक्का लागून सायकलस्वाराचा मृत्यू

ट्रकमधून होळी नेताना एकाने बाईकस्वाराला फुगा मारला, यात त्याचे संतुलन बिघडल्याने मोटारसायकल चालकाने सायकल स्वाराला धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुंबईत मस्करीची कुस्करी, होळीला रंगांचा फुगा मारला, बाईकचा धक्का लागून सायकलस्वाराचा मृत्यू
फुगा लागून बाईकस्वाराचा तोल गेला, धडक लागून सायकलस्वाराचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 8:06 AM

विरार : होळी (Holi 2022) खेळताना मस्करीची कुस्करी झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. रस्त्याने जाणाऱ्या ट्रकमधील तरुणांनी बाईकस्वाराच्या दिशेने रंग आणि पाण्यांनी भरलेला फुगा मारला. मात्र हा फुगा लागून गडबडलेल्या दुचाकीस्वाराचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला. हा बाईकस्वार शेजारुन येणाऱ्या सायकलवर धडकला. यामध्ये सायकल स्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ऐन होळीच्या दिवशी समोर आली आहे. मुंबईजवळच्या विरार पश्चिम पुरापाडा परिसरात ही घटना घडली आहे. रामचंद्र पटेल असे मृत्यू झालेल्या सायकल स्वाराचे नाव आहे. रंगांची उधळण करण्याच्या होळीच्या दिवशीच सायकल स्वाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोटारसायकल चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

विरारमध्ये होळीच्या दिवशी फुगा मारल्याने सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ट्रकमधून होळी नेताना एकाने बाईकस्वाराला फुगा मारला, यात त्याचे संतुलन बिघडल्याने मोटारसायकल चालकाने सायकल स्वाराला धडक दिली. या धडकेत सायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम पुरापाडा परिसरात ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

सायकलस्वार हा अर्नाळावरून विरारच्या दिशेने येत होता, तेवढ्यात अर्नाळा किल्ला येथील तरुण भरधाव वेगात मोटारसायकलवर अर्नाळाच्या दिशेने जाताना पुरापाडा या ठिकाणी त्याने सायकल स्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मोटारसायकल चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र सरकारची होळीसाठी नियमावली जाहीर, साध्या पद्धतीने धुळवड करण्याचे आवाहन

देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.